शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
3
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
4
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
7
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
8
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
9
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
10
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
11
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
12
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
13
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

ग्रामीण पोलिसांनी बँक ग्राहकांना लुटणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 9:44 AM

पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकांच्या बाहेर ग्राहकांच्या पैशाची लूटमार करणाऱ्या दोघांचा पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.

पुणे : पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकांच्या बाहेर ग्राहकांच्या पैशाची लूटमार करणाऱ्या दोघांचा पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही शिरुरमध्ये ही कारवाई करण्यात आली. प्रसाद शामदास कुंचला (वय ३०, रा़ बिटरगुंटा, ता़ जि़ नेल्लुर, आंध्र प्रदेश) आणि श्रीनिवास एस सुकमनियन (वय ४५, रा़ वेलईपट्टी, जि़ मदुराई, तामिळनाडु) अशी त्यांची नावे आहेत. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडुमधील अनेक टोळ्या अशा प्रकारचे गुन्हे करत असतात. या दोघांनी रांजणगाव, इंदापूर, बारामती, सासवड, शिरुर, शिक्रापूर या ठिकाणी जबरी चोरी, वाहनांच्या काचा फोडून मोटारसायकलची डिकी उचकटून रोख रकमेची चोरी केल्याचे ते सांगत आहे. त्यांनी शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी रांजणगावमधील बँकेच्या परिसरामध्ये ग्राहकाला लुबाडले आहे.  पुणे जिल्ह्यात बँकेच्या ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार वाढले असल्याचे गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी एक पथक स्थापन केले. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक उपनिरीक्षक  दत्तात्रय गिरमकर, दयानंद निम्हण, हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, जनार्धन शेळके, विजय कांचन, राजू मोमीन, बाळासाहेब खडके, धिरज जाधव या पथकाने जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांच्या ठिकाणाची माहिती घेतली.अशा प्रकारचे गुन्हे इंदापूर, बारामती, शिरुर, शिक्रापूर, सासवड आणि रांजणगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेले होते. या परिसरामधील सी सी टीव्ही संकलीत करण्यात आले. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे गुन्हे पुणे, सातारा, नवी मुंबई, जळगाव या ठिकाणी घडले होते. त्याची माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार आरोपींचा शोध घेतला जात असताना संशयित शिरुर स्टेट बँक परिसरामध्ये चोरी करता आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने स्टेट बँकेच्या परिसरात पोहचले़. पोलिसांना पाहताच हे दोघे पळून जाऊ लागले. तेव्हा त्यांचा पाठलाग करुन पोलिसांनी पकडले.हे दोघेही सराईत गुन्हेगार असून यापूर्वी २०१६ मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करीत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील रहिवासी असून ते टोळीने पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाड्याचे खोलीमध्ये राहतात. त्यानंतर रेकी करून चो-या करतात. मोटारीच्या काचा फोडण्यासाठी लोखंडी बॉल बेरिंग, अंगावर खाज सुटण्याची पावडर अंगावर घाण टाकणे, वाहनांच्या काचांवर ऑईल टाकणे, रस्त्यावर पैसे पडले आहेत, असे सांगून वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे करीत असतात. त्यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात ७, रांजणगाव, बदलापूर, शिक्रापूर येथे प्रत्येकी एक असे १० गुन्हे दाखल आहेत.