ग्रामीण उद्योगांना चालना हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:57+5:302020-12-05T04:16:57+5:30
लोकमत न्युज नेटवर्क पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर गावात २४ तास वीज, चांगले रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि ...

ग्रामीण उद्योगांना चालना हवी
लोकमत न्युज नेटवर्क
पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर गावात २४ तास वीज, चांगले रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि योग्य कनेक्टिव्हीटी असल्यास गाव समृद्ध होऊ शकेल. त्यासाठी सरपंचाची भूमिका महत्वाची आहे. तसेच, प्रत्येक गाव आर्थिक स्वावलंबी करायचे असेल तर ग्रामिण उद्योगांना अधिक चालना द्यावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित तीन दिवसीय आॅनलाईन दुसºया ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या समारोप समारंभ ते बोलत होते. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सरंगी, माजी केंद्रीय कृषी राज्य मंत्री हुकुमदेव नारायण यादव, जम्मू काश्मिरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा, खासदार पी.पी.चौधरी, विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटचे संस्थापक राहुल कराड आदी उपस्थित होते.
राज्यात बांधण्यात आलेल्या १८० पुलांच्या ठिकाणी जल योजनेच्या माध्यमातून तलाव निर्मिती करण्याची योजना असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगतिले. गावांच्या समृध्दीसाठी शिक्षण, आरोग्य, पाणी, क्रीडा, संस्कार, अध्यात्म आणि बाजारपेठ सारख्या बहुअंगाने विचार करावा. शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा उपयोग करून गावाचा सर्वांगिण विकास करावा. आपल्या कामाचा लेखाजोखा तपासून नियोजन करावे, असे त्यांनी नमुद केले.
‘गाव सशक्तीकरणसाठी कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी हवी. तसेच गावाची आर्थिख स्थिती मजबुत करणे व कृषी क्षेत्राला वेग देण्याची गरज आहे.१५ व्या आयोगात ३ लाख कोटीपेक्षा अधिक रुपयांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती तोमर यांनी दिली.
------------