शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

रुपी विलिनीकरणाचा प्रस्ताव आरबीआयला पाठविणार : सुधीर पंडित 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 8:26 PM

८५ हजार ठेवीदारांना सव्वातीनशे कोटी केले परत

ठळक मुद्देआरबीआयने बँकेच्या निबंर्धात केली वाढसंबंधित बँकेवर आर्थिक बोजा पडणार नाही याची दक्षता

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रुपी सहकारी बँकेचे विलिनीकरण करुन घेण्याची तयारी दर्शविली आहे. रुपी बँक प्रशासनाने ठेवीदारांचे नुकसान होऊ नये आणि संबंधित बँकेवर आर्थिक बोजा पडणार नाही याची दक्षता घेत विलिनीकरणाचा प्रस्ताव राज्य बँकेस दिला आहे. तसाच प्रस्ताव रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला (आरबीआय) पाठविण्यात येणार असल्याची माहिती रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सी. ए. सुधीर पंडित यांनी दिली.आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने रुपी बँकेववर २०१३ साली निर्बंध घातले आहेत. त्यामुळे लाखो ठेवीदार-खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले आहेत. आरबीआयने बँकेच्या निबंर्धात २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबत कार्यवाही करण्यास प्रशासकीय मंडळाला कालावधी मिळेल. राज्य सहकारी बँकेने रुपी बँकेचे विलिनीकरणाची तयारी दर्शवित रुपीची आर्थिक पडताळणी (ड्यू डिलिजन्स) देखील केली आहे. रुपी बँकेने विलिनीकरणाचा प्रस्ताव राज्य बँकेला पाठविला आहे. हा प्रस्ताव आता आरबीआयला देखील पाठविण्यात येईल. पुढील टप्प्यात राज्य बँक आणि रुपी बँकेचा विलिनीकरणाचा संयुक्त प्रस्ताव आरबीआयला पाठविण्यात येईल. मार्च २०१९ अखेरीस बँकेने ११ कोटी २० लाख रुपयांची कर्ज वसुली केली होती. तसेच, बँकेस १० कोटी ५९ लाख रुपयांचा परिचलनात्मक नफा देखील झाला. मार्च २०२० पर्यंत ४० कोटी रुपयांची कर्ज वसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच आणणे, बेपत्ता कर्जदार-जामिनदारांवर फौजदारी कारवाई करणे, कर्ज बुडव्यांची नावे अन्य बँकाना कळविणे आणि मालमत्तांचे लिलाव पुकारणे अशी कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच, कर्ज वसुली बरोबरच बँकेचा प्रशासकीय खर्च देखील कमी करण्यात येत आहे. प्रशासकीय खचार्पोटी २०१३ साली बँकेचा ८४ कोटी ३७ लाख रुपये खर्च होत होता. तो खर्च १५ कोटी २० लाख पर्यंत कमी करण्यात यश आल्याचे पंडित यांनी सांगितले. --------------------

८५ हजार ठेवीदारांना सव्वातीनशे कोटी केले परतलग्न, शिक्षण आणि वैद्यकीय कारणासाठी बँकेतील ८५ हजार ९०३ ठेवीदारांना हार्र्डशीप योजनेअंतर्गत ३३९ कोटी ८५ लाख रुपयांच्या ठेवी परत केल्या आहेत. बँकेचे ५ लाख १२ हजार ठेवीदार असून, त्यांच्या १ हजार २९३ कोटी ७३ लाख रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेRupee Bankरुपी बँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक