शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

"पैसे दिले नाही म्हणूनच…", स्वारगेट अत्याचार प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:00 IST

Pune Crime News : स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली.

Pune Crime News ( Marathi News ) : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला काल मध्यरात्री अटक केली. दरम्यान, आरोपीला १२ मार्चपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झाल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही या पद्धतीचा दावा केला आहे. ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट करुन हा दावा केला आहे. 

संतोष देशमुख हत्या: सीआयडीच्या आरोपपत्रात नावे असलेले 'ते' आठ आरोपी कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठा दावा केला आहे.  या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा पाटील ठोंबरे यांनी केला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर याबाबत एक पोस्ट केली आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये काय आहे?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुणे शिवाजी कोर्टात बस स्टँड मधील आरोपीला आणायच्या वेळी डीसीपी गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली.

मॅडम तुम्ही आंदोलन करणार असेल,आरोपीला काळे फसणार करणार असेल तर प्लीज करू नका. त्याचवेळी साहेबांना सांगितले घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेलतर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे.केसची माहिती घेणे केसचा स्टडी करणे गरजेचे आहे, असंही त्यांनी लिहिले. 

"पण बस स्टँड घटनेत, पुणे नाहकच बदनाम झाले ऐका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो, असा दावा ठोंबरे यांनी केला. दुसरे  बस स्टँड आगराची व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला.आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच,असं या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :swargate bus depotस्वारगेट बसस्थानकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस