शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Rupali Patil Thombare: पवार साहेबांना आशीर्वाद देतील असे 'हात' नाहीत, वटवृक्षाच्या सावलीत 'मविआ'त स्थिरावणार; रुपाली पाटील यांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:01 IST

Rupali Patil Thombare Joining NCP: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare Joining NCP) या अखेर महाविकास आघाडीत स्थिरावणार

पुणे-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare Joining NCP) या अखेर महाविकास आघाडीत स्थिरावणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. खुद्द रुपाली पाटील यांनीच ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. रुपाली पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अनेक शक्यता आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर सर्व चर्चांना रुपाली पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 

रुपाली पाटील यांनी याबाबतच एक सूचक ट्विट केलं आहे. "आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे 'हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे 'पाय' दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार...", असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं आहे. ट्विटमध्ये पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील टॅग केलं आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 

रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता. 

राज ठाकरेंना लिहिलं होतं भावनिक पत्र‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत”, असं भावनिक पत्र रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना लिहिलं आहे.

संबंधित बातम्या-सर्व प्री-प्लॅन, रुपाली पाटील यांनी राजकीय आत्महत्या केली; मनसेनेही दिलं प्रत्युत्तर'सूर्य तळपतील चंद्र झळकतील'; रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे