शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रुपाली चाकणकरांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 20:25 IST

धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ....

धायरी : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन करून चाकणकर यांना पुढील ७२ तासात जिवे मारू, अशी धमकी दिली आहे. या धमकी नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मंगळवार ३१ मे रोजी रुपाली चाकणकर यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच असा धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवर सोमवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता. यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील ७२ तासात जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली.

त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी ज्या नंबर वरून फोन आला होता. त्या व्यक्तीशी संपर्क केला असता तो व्यक्ती हा अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे समजले आहे. याबाबत पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. 

रुपाली चाकणकर यांना अशा धमकीचा फोन पहिल्यांदाच आलेला नाही. तर याअगोदरही दोन वेळा त्यांना धमकीचे फोन गेले होते. तर रुपाली चाकणकर तुमचा कार्यक्रम करु, अशा प्रकारची भाषा त्या धमकीच्या फोनमध्ये वापरण्यात आली होती.  महिला आयोगाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांना राज्य महिला आयोगाचा दणका दाखवला होता. त्यानंतर असे धमकीचे फोन आल्याने चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीRupali Chakankarरुपाली चाकणकर