धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार; चला, महामॅरेथॉनमध्ये धावू या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:06 AM2019-02-06T02:06:48+5:302019-02-06T02:07:12+5:30

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार आहे. ‘लोकमत’ने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे घोषवाक्य घेऊन ‘महामॅरेथॉन’सारखा स्मार्ट उपक्रम राबविला आहे.

Running is a smart exercise type; Come on, walk in the mammothathon! | धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार; चला, महामॅरेथॉनमध्ये धावू या!

धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार; चला, महामॅरेथॉनमध्ये धावू या!

Next

पुणे : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार आहे. ‘लोकमत’ने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे घोषवाक्य घेऊन ‘महामॅरेथॉन’सारखा स्मार्ट उपक्रम राबविला आहे. पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी ही मोठी संधी आहे. चला या महामॅरेथॉनमध्ये धावू या, अशा शब्दांत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी या शर्यतीत सहभागी होण्याबाबत आवाहन केले.

‘लोकमत’तर्फे व्हीटीपी रिअ‍ॅलिटी प्रस्तुत महामॅरेथॉनचे येत्या १७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. माणिकचंद आॅक्सिरिच आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) यांच्या सहयोगाने ही मॅरेथॉन होणार आहे.

जगताप म्हणाले, आरोग्य चांगले, तर सर्व काही आपण साध्य करू शकतो. त्यासाठी कुटुंबातील लहान, तरुण, वृद्ध आदी सर्वांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज पहाटे धावायला हवे. आपल्या प्रकृतीला साजेसा व्यायाम नेहमी केला पाहिजे. त्यासाठी आळस करून चालणार नाही. ‘लोकमत’ने आपणा सर्वांना या महामॅरेथानॅच्या निमित्ताने धावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शहरातील अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ‘लोकमत’ने नागरिकांच्या आरोग्यासंबंधी एक पाऊल पुढे टाकून ‘लोकमत महामॅरेथॉन’ची सुरुवात गेल्या वर्षी केली होती. ‘लोकमत’तर्फे या महोत्सवाचे आयोजन होत असताना यात आम्हीही ‘लोकमत’बरोबर खांद्याला खांदा लावून सहभागी झालो आहोत. लहान मुले मोबाईल तसेच इतर गॅझेटवर खेळत आहेत. त्यामुळे चांगली सुदृढ पिढी निर्माण होणार नाही. हा उपक्रम भावी पिढी घडविण्यासाठी उत्तम पर्याय देणारा आहे. या पिढीला मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी ‘महामॅरेथॉन’ चांगली पर्वणी आहे. मी व माझे कुटुंबीय या ‘महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होत आहोत. तुम्हीदेखील सहभागी व्हा.
 

Web Title: Running is a smart exercise type; Come on, walk in the mammothathon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे