शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भोर शहर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट; शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 16:42 IST

रोडरोमिओंना चाप लावण्याची मागणी...

भोर (पुणे) :भोर शहरातील रस्त्यावर, गल्ली बोळातून जोरजोरात गाड्या उडवून फिरणारे रोडरोमिओ, शाळा, महाविद्यालयांच्या गेटवर, बसस्थानकावर गर्दी करणाऱ्यांमुळे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सायलेन्सरला फटाक्याचे आवाज लावून वेगात गाडी पळवल्याने अपघात होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रोडरोमिओंना चाप लावण्यासाठी भोर शहरात व ग्रामीण भागात पोलिसांमार्फत विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

भोर शहरात दुचाकी गाड्या वेगाने पळवणे, वेगवेगळ्या आवाजात हॉर्न वाजवणे, शाळा, कॉलेजच्या बाहेर छेडछाड करणे आदी प्रकारात वाढ होत आहे. शहरातील सर्वच रस्त्यावर होणारी वाढती अतिक्रमणे त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी टपऱ्यांवर मद्यपान करणारे भुरटे भाई, आठवडे बाजारात मोबाइल चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यासाठी आठवडे बाजारात पोलिसांची नेमणूक करून सदर चोरांना पकडणे गरजेचे आहे. तरच शहरातील अतिक्रमणे कमी होतील. रोडारोमिओंचा त्रास मोबाइल, मंगळसूत्र चोरी होणार नाही यासाठी भोर पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत अशी मागणी विद्यार्थांसह नागरिक करीत आहेत.

छेडाछेडीच्या प्रकारात होतेय वाढ -

दरम्यान ग्रामीण भागातून विद्यार्थिनी भोर शहरात शिक्षणासाठी एसटी बसने, तसेच मिळेल त्या वाहनाने येत आहेत. महाविद्यालय सुरू होण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेत एसटी स्थानक तसेच शाळा, काॅलेज महाविद्यालय परिसरात रोडरोमिओ दुचाकी घेऊन उभे असतात. दुचाकी सुसाट चालवणे, हॉर्न मोठ्याने वाजवणे, एसटी बस स्थानकात दुचाकी घेऊन फिरणे असे उद्योग सध्या रोडरोमिओ यांनी सुरू केले आहेत. यातून छेडाछेडीचे प्रकारही वाढत आहेत. रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी महाविद्यालय सुरू होताना व सुटताना या दोन वेळी पोलिसांचे विशेष पथक तयार करून विनाकारण फिरणाऱ्या रोडरोमिओंना चांगलाच धडा शिकवण्यासाठी वेळप्रसंगी चोप देणे गरजेचे आहे.

गुन्हेगारीतही होतेय वाढ -

भोर शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गुन्ह्याच्या तपासाला वेळ लागत आहे. मुले, मुली पळून जाण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीर व अवैधधंद्यात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र याकडे भोर पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :bhor-acभोरPuneपुणे