पुणे : हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात गुंडांनी वाहनांची तोडफोड करीत, भाजी विक्रेत्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. गुंडांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल खान (वय ७४, रा. इंदिरानगर हांडेवाडी रस्ता, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भाजी विक्री करीत असताना काही व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगमधील गेटला लाथा मारून ते तोडून पार्किंगमधील वाहनांची त्यांनी तोडफोड केली. शेजारी असलेल्या ए. टी. एम.ची तोडफोड करून फिर्यादी यांना धक्काबुक्की करून त्यांच्या हातगाडीचे नुकसान केले. फिर्यादीच्या मुलीलाही शिवीगाळ केली. त्यांच्या वस्तीमधीलच एका महिलेच्या घरात घुसून सामानाची नासधूस केली. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. कुनगर पुढील तपास करीत आहेत.
हडपसरमध्ये गुंडांची दहशत; कोंढवा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 15:28 IST
हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात गुंडांनी वाहनांची तोडफोड करीत, भाजी विक्रेत्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडला.
हडपसरमध्ये गुंडांची दहशत; कोंढवा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ठळक मुद्देकोंढवा पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखलगुंडांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण