Injured third parties in Jalgaon Taptiganga Express | जळगावात ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांना मारहाण

ठळक मुद्देरविवारी दुपारी अडीच वाजेची घटनाहल्लेखोरांनी डब्यातून खाली ओढत नेत जंगलात केली मारहाणपोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने संताप

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२५ - पश्चिम रेल्वे मार्गावरील गिरणा नदीवरील रेल्वे पुलानजीक ताप्तीगंगा एक्स्प्रेस थांबवून चार जणांनी संजना खुशी जान ( वय ४० रा. राजीव गांधीनगर, जळगाव) या तृतीयपंथीयाला डब्यातून खाली ओढत नेत जंगलात बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी पायावर चाकू हल्ला केला व दागिन्यांसह रोकड लांबविली तर त्याचा साथीदार काजल तमन्ना जान (रा.गोलाणी मार्केट) ला मारहाण झाली. ही घटना रविवारी दुपारी २़३० वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, हल्ला झाल्यानंतरही फिर्याद घेण्यास तालुका पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने जखमीसह इतर तृतीयपंथीयांनी सोमवारी दुपारी १ वाजेच्या जिल्हा रुग्णालयात संताप व्यक्त केला. जखमी संजना खुशी जान वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
पैसे मागण्यावरुन झाला वाद
जखमी संजनाने दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे रेल्वेने अमळनेरला सहकाºयांसोबत गेले होतो़ तेथून परत जळगावकडे ताप्तीगंगा एक्स्प्रेसमधून येत असताना पैसे मागण्यावरुन अमळनेर येथील चार तरुणांशी वाद झाला.