मंचर शहरात कोरोना प्रवेश करताच आरटीपीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:10 IST2021-05-12T04:10:16+5:302021-05-12T04:10:16+5:30
मंचर ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंचर गाव हे अलर्ट म्हणून ...

मंचर शहरात कोरोना प्रवेश करताच आरटीपीसीआर
मंचर ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंचर गाव हे अलर्ट म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर मंचर ग्रामपंचायतीने काही बंधनकारक निर्णय घेतले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.त्यानुसार मंचर गावचे ग्रामस्थ सोडून इतर गावच्या ग्रामस्थांना, रहिवाशांना जर मंचर शहरात प्रवेश करायचा असेल तर त्यांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच संबंधितांना मंचर गावात प्रवेश देण्यात येईल.
आरटीपीसीआर कोरोना चाचणी न करता मंचर ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना 14 दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात येईल.या क्वारंटाईनचा खर्च सदर नागरिकांना स्वतः करावा लागणार आहे.त्याचबरोबर आशा नागरिकांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येणार आहेत.
येणाऱ्या इतर भागातील नागरिकांनी व शहरात येताना कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन उपसरपंच युवराज बाणखेले यांनी केले आहे.