शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘पुष्पक’ला आरटीओची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 19:22 IST

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव घरापासून स्मशानभुमीपर्यंत पोहचविणे तसेच तिथून नातेवाईकांना पुन्हा घरी सोडण्याची सेवा पुरविली जाते.

ठळक मुद्देपार्थिक नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून भरमसाठी शुल्कपीएमपीला दरवर्षी बसची रचना बदलण्यासाठी करावी लागणारी कसरत वाचणार

पुणे : पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेणाऱ्या ‘पुष्पक’ या बससेवेला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शववाहिनी म्हणून मान्यता दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही सेवा आरटीओच्या मान्यतेशिवाय सुरू होती. पण ‘आरटीओ’कडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून मागील काही वर्षांपासून प्रवासी वाहतुकीच्या बसचे शववाहिनीत रुपांतर करण्यात आले आहे. पुणे महापालिका क्षेत्रासाठी तीन तर पिंपरी चिंचवडसाठी एक अशा एकुण ४ पुष्पक बस आहेत. याद्वारे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव घरापासून स्मशानभुमीपर्यंत पोहचविणे तसेच तिथून नातेवाईकांना पुन्हा घरी सोडण्याची सेवा पुरविली जाते. त्यासाठी ६०० रुपये शुल्क आकारले जाते. बसचे शववाहिनीत रुपांतर करण्यासाठी पीएमपीला मोठा खटाटोप करावा लागतो. बसची संपुर्ण रचना बदलावी लागते. पण आरटीओकडून आतापर्यंत या शववाहिनीला मान्यता देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही सेवा बेकायदेशीरपणे सुरू होती. पण ही सेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे. पार्थिक नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून भरमसाठी शुल्क आकारले जाते. तसेच त्यामध्ये जागाही पुरेशी नसल्याने नातेवाईकांना इतर व्यवस्था करावी लागते. त्यामुळे अनेक जण पुष्पक सेवेलाच प्राधान्य देतात. पीएमपीच्या पुणे कार्यालयात त्यासाठी दररोज १० ते १२ दुरध्वनी येतात. यापार्श्वभुमीवर पीएमपी प्रशासनाने शववाहिनीला मान्यता देण्याची विनंती ‘आरटीओ’कडे केली होती. त्यानुसार ‘आरटीओ’कडूनही परवानगी मिळाल्याची माहिती ‘पीएमपी’तील अधिकाऱ्यांनी दिली. आरटीओ मान्यता दिल्याने पीएमपीला दरवर्षी बसची रचना बदलण्यासाठी करावी लागणारी कसरत वाचणार आहे. दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर डाव्या बाजुचे दोन्ही दरवाजे बंद करून मागील बाजूला दरवाजा करावा लागत होता. प्रमाणपत्रासाठी पुन्हा हा दरवाजा बंद करून डाव्या बाजूचे दरवाजे खुले करावे लागत होते. 

 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलRto officeआरटीओ ऑफीस