शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एनओसी मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या आरटीओ खाजगी एजंटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 09:23 IST

तक्रारदार यांना त्यांच्या मित्राची गाडी पिंपरी चिंचवड आरटीओकडून पुणे आरटीओकडे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज केला होता.

पुणे : पिंपरी आरटीओकडून पुणे आरटीओकडे गाडी ट्रान्सफर करण्यासाठी एनओसी मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. अक्षय मारुती माळवे (वय २४, रा. गंगानगर सिसोदिया मार्केटजवळ, आकुर्डी) असे या खाजगी एजंटचे नाव आहे.

तक्रारदार यांना त्यांच्या मित्राची गाडी पिंपरी चिंचवड आरटीओकडून पुणे आरटीओकडे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज केला होता. त्यांची एनओसी आरटीओ कार्यालयातून देण्यासाठी खर्च येईल, असे सांगून अक्षय माळवे याने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच मागताना तुमची फाईल ५ टेबलवरुन फिरते. त्या सर्व टेबलवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे त्याने सांगितले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार आल्यावर त्याची पडताळणी करण्यात आली. तेव्हा माळवे याने १३०० रुपये घेण्याची कबुली दिली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोशी येथील आरटीओ कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारी सापळा लावला. त्यात तक्रारदाराकडून पैसे घेताना अक्षय माळवे याला पकडण्यात आले. भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनिल बिले अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस