शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

RTE Admission Bribe Case ; जे पालक पैसे देण्यास तयार होतील, त्यांचेच अर्ज पात्र करा; गटशिक्षणाधिकाऱ्यांनीच दिल्या होत्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 20:50 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणात अटकेत असलेले हवेली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे यांनीच 18 अपात्र केलेल्या अर्जातून जे पालक पैसे देण्यास तयार होतील त्यांचेच अर्ज पात्र करण्याच्या सूचना दिल्याचे पोलिसांना तपासातून दिसून आले आहे. तसेच तक्रारदार आणि पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी विकास नंदकुमार धुमाळ यांच्यामध्ये झालेल्या संभाषणातून वालझाडे यांनी प्रत्येक पडताळणी समिती सदस्याकडे यादी देऊन प्रवेशासंबंधी काम सोपविले. या सदस्यांनी आणखी किती तरी पालकांना लाचेची मागणी केली असल्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी करत दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करीत विशेष न्यायधीश एस.बी हेडाऊ यांनी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे. तक्रारदार यांच्या मुलीचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अन्वये हडपसर येथे एका शाळेत लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादीत नाव समाविष्ट करायचे होते. त्याकरिता कागदपत्रे तपासून ऑनलाईन मान्यता देण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. ही मान्यता देण्यासाठी आरोपी विकास धुमाळ याने गटशिक्षणाधिकारी वालझाडे यांच्यासाठी ५० हजारांची लाचेची मागणी केली होती. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार मिळालेल्या प्रवेशाला कागदपत्रे तपासून ऑनलाईन मान्यता देण्यासाठी त्यांनी लाच घेतली. हवेली पंचायत समितीच्या बाहेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी, दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपींना गुरूवारी (दि.2) न्यायालयात हजर करण्यात आले. वालझाडे यांनी  तपासास सहकार्य केले नसून, उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तसेच ताब्यात जे दफ्तर मिळाले त्यात १८ अपात्र केलेले प्रवेश अर्ज आढळून आले. त्यातील ब-याच प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याचे धुमाळ यांनी मान्य केले आहे. त्यामधील हिस्सा वालझाडे यांना दिल्याचे धुमाळ यांनी सांगितले आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का?  त्याचा तपास करायचा आहे. शासन आर्थिक दुर्बल घटकांसाठी चांगल्या योजना कार्यान्वित करते. मात्र त्याचा किती दुरूपयोग होतो याकडे लक्ष वेधत आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी अँड रमेश घोरपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

टॅग्स :PuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसEducationशिक्षणArrestअटक