शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शौचालय वापरासाठी 7 रू, चाकणकरांकडून 'ट्विट तक्रारीची क्वीक दखल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 11:52 IST

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याीतल मंचर एस.टी स्थानक (४१०५०३) येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मंचर येथील सुलभ शौचालायात महिलांना होणारा त्रास या युवकाने ट्विटरवरुन मांडला.

ठळक मुद्देतेजसने आपल्या ट्विटमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील आणि मुख्यमंत्री यांना मेन्शन केलं आहे.

पुणे - सर्वसामान्य नागरिकांना दैनंदीन जीवन जगत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळेच, अगदी घरी नळाला येणाऱ्या पाण्यापासून ते सार्वजनिक शौचालयातील असुविधेबद्दलही सातत्याने तक्रारी करण्यात येतात. मात्र, तुमच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईलच, असे होत नाही. मात्र, एका युवकाने ट्विटरवरुन केलेल्या तक्रारीची दखल थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. 

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याीतल मंचर एस.टी स्थानक (४१०५०३) येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मंचर येथील सुलभ शौचालायात महिलांना होणारा त्रास या युवकाने ट्विटरवरुन मांडला. येथील शौचालयात असलेला परप्रांतीय पुरुष कर्मचारी शौचालायात येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे शौचालाय वापरासाठी जबरदस्ती पैसे घेत असून असभ्य भाषेत बोलत आहे. सदरच्या शौचालायात महिला कर्मचारी नाही. संबंधित पुरुष कर्मचारी महिलाकडून शौचालाय वापरासाठी ७ रु. घेतो, पैसे देण्यास नकार दिल्यास महिलास असभ्य भाषेत ओरडतो. तसेच त्यांना शौचालाय वापरास मज्जाव करून त्यांचे मागे जाण्याचा प्रयत्न करतो, अशी तक्रारच तेजस पडवळ नामक ट्विटरयुजर्सने केली आहे. 

तेजसने आपल्या ट्विटमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील आणि मुख्यमंत्री यांना मेन्शन केलं आहे. या युवकाच्या ट्विट तक्रारीची रुपाली चाकणकर यांनी क्वीक दखल घेतली. तसेच, या ट्विटला रिप्लाय देत, आजच दखल घेतली जाईल, असे प्रत्युत्तरही चाकणकर यांनी दिली आहे. त्यामुळे, आता संबंधित शौचालय चालकावर किंवा तेथील ठेकेदारवर काय कारवाई होणार, हे सर्वांनाच पाहायचे आहे.   

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरWomenमहिलाPuneपुणेTwitterट्विटर