शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:52 IST

थकबाकीदारांमध्ये औद्योगिक, व्यावसायिक सर्वाधिक; अनधिकृत कनेक्शनची संख्या दुप्पट

पुणे : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, उत्पन्नाचे स्रोत मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत. असे असताना शहरामध्ये पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ४६८ कोटींच्या घरात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. तर शहरात सध्या केवळ १ लाख ६० हजार अधिकृत नळ कनेक्शन असून, अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या दुप्पट म्हणजे तब्बल साडेतीन लाखांच्या घरात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक असताना केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळजोडणी आहे. याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती, एकूण थकबाकी व अधिकृत नळजोडणी संख्या याबाबत विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली. यामध्ये सध्या शहरामध्ये घरगुती वापराचे सुमारे १ लाख २२ हजार अधिकृत नळ कनेक्शन आहेत, तर व्यावसायिक, औद्योगिक वापराचे सुमारे ३८ हजार नळ कनेक्शन आहेत. यामध्ये घरगुती वापर करत असलेल्या कुटुंबांकडे सुमारे १३७.५७ कोटी रुपयांची, तर औद्योगिक व व्यावसायिक वापर करत असलेल्याकडे तब्बल ३३०.१५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे प्रशासनाने लेखी दिले आहे.शहरातील नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. थकबाकीदारांमध्ये दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर, रस्ते दुरुस्ती, रुंदीकरणामध्ये बंद पडलेली नळ कनेक्शन असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांची संख्यादेखील वाढली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी अनेक वेळा लोकअदालत भरविण्यात आली, परंतु यालादेखील खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.- व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे