जिल्हाभरातून यकृत प्रत्यारोपणासाठी १२ लाख रुपये मदत झाली जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:16+5:302021-06-09T04:13:16+5:30

वाडा येथील गरीब कुटुंबातील कुणाल उर्फ कृष्णा दिलीप पावडे यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्रक्रिया पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात केली ...

Rs. 12 lakhs were collected for liver transplant from all over the district | जिल्हाभरातून यकृत प्रत्यारोपणासाठी १२ लाख रुपये मदत झाली जमा

जिल्हाभरातून यकृत प्रत्यारोपणासाठी १२ लाख रुपये मदत झाली जमा

वाडा येथील गरीब कुटुंबातील कुणाल उर्फ कृष्णा दिलीप पावडे यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्रक्रिया पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात केली जाणार आहे. अपेक्षित १५ लाख रुपये खर्च होणार आहे. भीमाशंकर येथे होमगार्ड ड्यूटी करीत असताना त्याला काविळीने विळखा घातला. मदतीसाठी कुणालची माहिती सोशल मीडियावरून अनेक ग्रुपवर शेअर केली. त्यातून मदतीसाठी हजारो हात पुढे आले आहेत. गावातील मित्र, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, व सोशल मीडियाच्या माध्यमातून भरीव मदत गोळा होत आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांच्या वतीने एक लाखाची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश कुणालच्या आईकडे देण्यात आला यावेळी सभापती विनायक घुमटकर, अरुण चांभारे, उमेश कुंभार, सुनील पावडे, बंटी पावडे, गोविंद वाडेकर, शिवाजी गोरे उपस्थित होते.

पावडे यांच्या उपचारासाठी सभापती विनायक घुमटकर पावडे यांच्या आईकडे मदतीचा धनादेश देताना.

Web Title: Rs. 12 lakhs were collected for liver transplant from all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.