शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विधानसभेसाठी भाजपाकडे आरपीआयचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 10:29 IST

गेल्या काही वर्षात पुणे शहरात भाजपाला फार मोठे राजकीय यश मिळाले आहे..हे यश आरपीआय बरोबर युती झाल्यामुळेच मिळाले असा आरपीआय कार्यकर्त्यांचा दावा आहे.

ठळक मुद्देकॅन्टोन्मेट देता येत नसेल तर वडगाव शेरी किंवा शिवाजीनगर द्यावा असा पत्रात उल्लेखआरपीआयला पुण्यात हक्काची जागा निर्माण करून देण्याची ही भाजपाला संधी

पुणे : विधानसभेच्या पुण्यातील जागांबाबत शिवसेनेची समजूत कशी काढायची या पेचात भारतीय जनता पार्टीचे नेते असतानाच आता त्यांच्याबरोबर युतीत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षानेही विधानसभेची पुणे शहरातील किमान एक जागा तरी आम्हाला मिळावी अशी मागणी करून तिढा निर्माण केला आहे. पक्षाच्या पुणे शहर शाखेने तसा लेखी ठराव करून तो मुख्यमंत्री व भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. महापालिकेत आरपीआयचे ५ नगरसेवक आहेत. ते सगळेच भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले असले तरीही त्यांनी आरपीआयचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. सत्तेतील सहभाग म्हणून भाजपाने त्यांना उपमहापौरपदही दिले आहे. त्याच आधारावर आता आरपीआयचे स्थानिक नेते विधानसभेची जागा मागत आहेत. वडगावशेरी, शिवाजीनगर व कॅन्टोन्मेंट असे तीन विधानसभा मतदारसंघ त्यांनी दिले असून त्यापैकी किमान एक तरी मिळावा असे त्यांचे म्हणणे आहे. या तीनपैकी कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघाबाबत हे नेते विशेष आग्रही आहे. हा विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे तिथे आमदार आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदावरून दूर करण्यात आले आहे. त्यामुळे तसेच मतदारसंघाच्या रचनेमुळे हाच मतदारसंघ मिळावा असे स्थानिक आरपीआय नेत्यांचे म्हणणे आहे.गेल्या काही वर्षात पुणे शहरात भाजपाला फार मोठे राजकीय यश मिळाले आहे. विधानसभा, त्यानंतर लोकसभा, मग महापालिका यात भाजपाचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. महापालिकेत तर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळून एकहाती सत्ता आली. हे यश आरपीआय बरोबर युती झाल्यामुळेच मिळाले असा आरपीआय कार्यकर्त्यांचा दावा आहे. शहरातील ५ प्रभागांमध्ये आरपीआयचे नगरसेवक असले तरीही प्रत्येकच प्रभागात आरपीआयची लक्षणीय मते आहेत. ही सर्व मते भाजपा उमेदवारांच्या पारड्यात पडल्यामुळेच भाजपाला विजय मिळाला, त्याची परतफेड त्यांनी आता विधानसभा मतदारसंघ देऊन करावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कॅन्टोन्मेट देता येत नसेल तर वडगाव शेरी किंवा शिवाजीनगर द्यावा असे पत्रात म्हटले आहे. या दोन्ही मतदारसंघातील आरपीआय च्या मतांची संख्या लक्षणीय आहे. तसेच महापालिकेप्रमाणेच आरपीआयचे इच्छुक भाजपाच्या चिन्हावरच ही निवडणूक लढवणे पक्षाला मान्य आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले की आरपीआयला पुण्यात हक्काची जागा निर्माण करून देण्याची ही भाजपाला संधी आहे. आरपीआय ने भाजपाला आतापर्यंत बरीच राजकीय मदत केली. हक्काची मते त्यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे त्यांनी आता आरपीआयची मागणी मान्य केली पाहिजे. त्यामुळे युती आणखी भक्कम होण्यास मदत होईल..........पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य केला आहे. विधानसभेसाठी आरपीआयला भाजपा ज्या जागा देणार आहे त्यात पुण्यातील एका जागेचा समावेश करावा असे त्यांनी मुख्यमंत्री तसेच भाजपा प्रदेशाध्यक्षांना कळवले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा