रोहितच्या शतकामुळे २२ यार्ड्स संघाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST2021-03-25T04:10:41+5:302021-03-25T04:10:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमीच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक ...

Rohit's century dominated the team for 22 yards | रोहितच्या शतकामुळे २२ यार्ड्स संघाचे वर्चस्व

रोहितच्या शतकामुळे २२ यार्ड्स संघाचे वर्चस्व

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमीच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या डावात २२ यार्ड्स संघाने १२९ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात रोहित कारंजकरच्या शतकाच्या जोरावर २६४ धावा करून श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लबविरुद्ध सामन्यात वर्चस्व राखले.

व्हिजन स्पोर्ट्स सेंटर, सिंहगड रस्ता येथील मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तीन दिवसीय लढतीच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात २२ यार्ड्स संघाने दिवसअखेर ५३ षटकांत ३ बाद २६४ धावा केल्या. तत्पूर्वी काल पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना २२ यार्ड्स क्रिकेट अकादमी संघाने ६१.२ षटकांत सर्व बाद ३५० धावा केल्या.

प्रत्युत्तरात श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब संघाचा डाव ५४.३ षटकांत २२१ धावांवर संपुष्टात आला. २२ यार्ड्स संघाने सुरेख गोलंदाजी करून पहिल्या डावात १२९ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात २२ यार्ड्स संघाने २६४ धावा केल्या. यात रोहित कारंजकरने धडाकेबाज फलंदाजी करत ११७ चेंडूत १९ चौकार व १ षटकारासह नाबाद १०२ धावांची खेळी केली. रोहितला नितीश सालेकरने ६४ धावा करून साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १३० चेंडूत ११४ धावांची भागीदारी केली. नितीश बाद झाल्यावर रोहितने श्रेयस केळकर (नाबाद ४७ धावा)च्या साथीत चौथ्या गड्यासाठी १२० चेंडूत १०४ धावांची भागीदारी करून संघाची आघाडी ३९३ धावांनी वाढविली. दोन्ही संघांचा अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.

संक्षिप्त धावफलक:

पहिला डाव : २२ यार्ड्स क्रिकेट अकादमी : ६१.२. षटकांत सर्व बाद ३५० धावा वि. श्रीसिद्धिविनायक क्रिकेट क्लब : ५४.३. षटकांत सर्व बाद २२१ धावा, क्षितिज कबीर ३९, संदीप शिंदे ४८, सिद्धार्थ रोमन ४०, श्लोक धर्माधिकारी २३, नीरज मोरे २१, ऋतुराज वीरकर २१, अमन मुल्ला ३-३०, फैयाज शेख २-३०, रोहित कारंजकर १-२२, नितीश सालेकर १-५४; २२ यार्ड्स संघाकडे पहिल्या डावात १२९ धावांची आघाडी,

दुसरा डाव : २२ यार्ड्स : ५३ षटकांत ३ बाद २६४ धावा, रोहित कारंजकर नाबाद १०२, नितीश सालेकर ६४, श्रेयस केळकर नाबाद ४७, अमन मुल्ला २९, क्षितिज कबीर २-२२,

Web Title: Rohit's century dominated the team for 22 yards