शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar: महाराष्ट्रात राजकारण विकासाचं होणार; भगव्या ध्वजाचं होऊ देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 17:47 IST

आमदार रोहित पवार (rohit pawar) यांच्या संकल्पनेतून कर्जत - जामखेड येथे भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे

ठळक मुद्देभारतातील सर्वात उंच अशा या भगव्या ध्वजाची उंची ७४ मीटर

पुणे : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत - जामखेड येथे भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रोहित पवार यांच्या हस्ते स्वराज्य ध्वज सोहळा पार पडला. यावेळी रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्यात विकासाचं राजकारण होईल. पण भगव्या रंगाचं राजकारण होऊ देणार नाही असा विश्वास या सोहळ्यात व्यक्त केला आहे. 

समानतेचा विजय असो, एकतेचा विजय असो, ध्वज ठराविक लोकांचा नाही तर तो सर्वांचं आहे. ध्वजाची खरी ताकद एकतेची आहे. असा संदेश देत त्यांनी मनोगताला सुरुवात केली. 

पवार म्हणाले, ''मला ध्वजामुळे पब्लिसिटी करायची नाही. लोक म्हणतात तुम्ही नेहमी विकासाबाबत बोलत होता मग आज हे नवीन काय आहे. त्यांना मी सांगू इच्छितो कि, मी विकासाचं राजकारण करणार पण या ध्वजाचे आणि रंगाचं राजकारण महाराष्ट्रात होऊ देणार नाही. अशा रंगाचे राजकारण खेळल्याने  भगव्या ध्वजाच्या विचारांची ताकद होते. 

''महाराष्ट्रात धार्मिक स्थळे, गावे, शहरे सर्व ठिकणांबरोबरच सर्वसामान्यांच्या मनामनात हा ध्वज गेला पाहिजे. कुटुंबातील माता, भगिनी, युवा पिढी सगळ्यांना ध्वजाचे महत्व कळायला हवे. आपण नवीन गाडी, घर घेतल्यावर नवीन हॉस्पिटल बांधल्यावर त्यांचं पूजन करतो. त्याप्रमाणेच या ध्वजाचे पूजन केले आहे.'' ''जातिभेदांमुळे आंदोलने होऊन डोकी मात्र सामान्य घरातल्या युवकांची फुटतात. आपली धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ, थोर व्यक्ती सगळ्यांनी एकच विचार दिला. कि सर्वानी एकत्र या.. हेच या ध्वजाचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी ध्वजाच्या विचारांना आत्मसात करून अन् जातिभेदाला विसरून एकत्र यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.''  

तब्बल ७४ मीटर उंचीचा ध्वज 

भारतातील सर्वात उंच अशा या भगव्या ध्वजाची उंची ७४ मीटर आहे. तर स्तंभाचे वजन १८ टन इतके आहे. 

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र