शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

भुकेल्यांसाठी ते ठरताहेत 'अन्नदूत'; बारामतीतील तरुणांच्या कार्याला रोहित पवारांनी दिली शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:11 IST

दीड महिन्यांपासून २०० जणांना अन्नदानाचे कार्य सुरू ; बारामतीच्या तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी 

सांगवी : कोरोनाच्या भीषण परिस्थितीत गरजूंच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेकांची उपासमार होत आहे. अशा कठीण प्रसंगात बारामतीमधील सात तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत असून गेल्या दीड महिन्यांपासून त्यांनी भुकेल्या लोकांच्या दोन्हीही वेळच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे. 

कोरोना लॉकडाऊन काळामध्ये अनेक कष्टकरी लोकांचे कामे बंद झाल्याने रस्ते, पदपथ, झोपडपट्टीत राहणारे, बस स्थानकात मुक्कामी राहणाऱ्या व हातावर पोट असलेल्यांचे दोन वेळच्या जेवणासाठी प्रचंड हाल झाले. हे दृश्य पाहुन बारामती शहरातील दानशूर तरूण एकत्रित आले आणी त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत  रोजच्या जेवणात २०० लोकांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करत माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. 

बारामतीतील आमराई भागातील दिनेश (सोनू) सोनवणे,यशवंत अवघडे,शुभम भिसे, विजय मोरे, संतोष जगताप, चंद्रकांत सावंत, जालिंदर उघडे अशी या अन्नदान करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. भुकेने व्याकुळ होऊन रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना जेवणाची पाकिटे वाटत आहेत. त्यांच्या समाजसेवेचे सगळीकडे कौतुक होतं आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन तरुणांचे कौतुक केले आहे.

बारामतीत रस्ते, पदपथावरील नागरिकांसाठी या तरुणांनी १८ एप्रिल रोजी सुरू केलेला अन्नदानाचा उपक्रम आज देखील सुरू असून आजचा त्यांचा  ४३ वा  दिवसा आहे. तरुणांनी अद्याप देखील हा उपक्रम कायम ठेवला आहे. गरीबांची भूक भागवण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आणी हजारपेक्षा अधिक लोकांची भूक शमवली आहे.

संपूर्ण संचारबंदीच्या काळात (३१ मे) पर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याची माहिती दिनेश सोनवणे यांनी दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी सूरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांना अडचणी येत आहेत. या काळात कोणी उपाशीपोटी राहू नये, यासाठी दिनेश सोनवणे व त्यांचे सहकारी मित्र हे गरजूंना घरपोच अन्नाची पाकिटे वाटप करीत आहेत. घरी अन्नाची पाकिटे तयार करून गरजूंपर्यंत पोचती केली जात आहेत.

टॅग्स :Baramatiबारामतीfoodअन्नRohit Pawarरोहित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या