मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये पुण्याचा रोहन जगात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:07+5:302021-04-01T04:12:07+5:30

पुणे : सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन ह्या जागतिक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या मॅथ्स ऑलिम्पियाड स्पर्धेत पुण्यातील खराडी येथील रोहन एदलाबादकर या ...

Rohan of Pune tops the world in Maths Olympiad | मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये पुण्याचा रोहन जगात अव्वल

मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये पुण्याचा रोहन जगात अव्वल

पुणे : सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन ह्या जागतिक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या मॅथ्स ऑलिम्पियाड स्पर्धेत पुण्यातील खराडी येथील रोहन एदलाबादकर या विद्यार्थ्याने जगात अव्वल क्रमांक पटकवला आहे. रोहनने या परीक्षेत पैैकीच्या पैैकी गुण मिळवून हे यश संपादन केले आहे.

सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनतर्फे दरवर्षी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा घेतली जाते. जगातील विविध ६२ देशांतील शाळांमधील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. या वर्षी ३ जानेवारीला इयत्ता चौथीकरिता ही स्पर्धा परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. ३१) जाहीर झाला.

रोहन एदलाबादकर हा खराडी येथील व्हिक्टोरीयस किड्स एडुकेयर्स शाळेचा विद्यार्थी आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला गणिताची आवड आहे. वैदिक गणित, मेंटल मॅथ्स इत्यादी वेगवेगळ्या पद्धतीने तो गणिताची आवड जोपासतो. डिसेंबर २०२० मध्ये ब्रिक्स देशातील गणित स्पर्धा परीक्षेतही १०० पैकी १०० गुण मिळवून तो पहिला आला होता.

Web Title: Rohan of Pune tops the world in Maths Olympiad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.