शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोस्विचद्वारे रोबोटिक हात

By admin | Updated: March 3, 2015 01:18 IST

‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ या विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ज्या लोकांनी अपघातात हात गमावले आहेत,

पुणे : ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ या विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ज्या लोकांनी अपघातात हात गमावले आहेत, त्यांची काळजी आता संपली आहे. कारण अशा लोकांना त्यांच्या कामात समस्यांना सामोरे जावे लागू नये या उद्देशाने मंदार वाजगे या विद्यार्थ्याने मायक्रोस्विचच्या आधारे नियंत्रित करणारा एक रोबोटिक हात तयार केला आहे. ज्यांनी आपले हात गमावले आहेत, परंतु ज्यांना अजूनही समाजाला, कुटुंबाला काहीतरी देण्याची इच्छा आहे अशा अपघातग्रस्तांचे स्वप्न मंदारने प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी हा हात तुटला आहे तिथे हा हात बसवून खऱ्या हाताला मायक्रोस्विचने जोडून त्या आधारे रोबोटिक हात नियंत्रित करायचा. या ठिकाणी मायक्रोस्विचचा उपयोग प्रेशर सेन्सरप्रमाणे करण्यात येतो. हा मायक्रोस्विच खऱ्या हाताची व स्नायूंची हालचाल डिटेक्ट करतो. त्यामुळे हात नसलेला माणूसदेखील एखादा खरा हात असलेल्या सामान्य माणसाप्रमाणे सर्व कामे करू शकण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींनी दोन्ही हात गमावले असतील ते या मायक्रोस्विचचा वापर करू शकणार नाहीत. कारण त्यांच्याकडे मायक्रोस्विचला सेन्स करणारा खरा हात नसेल. परंतु अशा व्यक्तींना चिंतेत पडण्याचे मुळीच कारण नाही. कारण मंदारने असा बूटदेखील तयार केला आहे ज्या बुटाला मायक्रोस्विच बसवण्यात आला आहे. जो पायांची व स्नायूंची हालचाल डिटेक्ट करतो अणि ज्याच्याआधारे ती व्यक्ती त्याला बसवलेले दोन्ही रोबोटिक हात पायाच्या आधारे नियंत्रित करू शकतो. मंदारला या रोबोटिक हाताची कल्पना टेलिव्हिजनवरील रोबोज पाहून सुचली. ई-वेस्ट साहित्यापासून या हाताची निर्मिती करण्यात आली आहे. या हाताच्या मॉडेलसाठी केवळ ५00 रुपयाचा खर्च आला आहे. तसेच या प्रयोगासाठी नागपूरमधील महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्युअर सायन्स गटामध्ये मंदारने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. (प्रतिनिधी)सध्या हे केवळ एक मॉडेल असल्यामुळे या हाताने कामे करता येत नाहीत. परंतु मायक्रोस्विचच्या जागी मोशन सेन्सर बसवल्यास सर्व प्रकारची कामे करता येतील. - मंदार वाजगे