‘सिक्युरिटी डिपॉङिाट’च्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट
By Admin | Updated: December 13, 2014 00:32 IST2014-12-13T00:32:35+5:302014-12-13T00:32:35+5:30
सुरक्षिततेच्या नावाखाली हजारो रुपये ‘सिक्युरिटी डिपॉङिाट’ घेऊन विद्याथ्र्याची लूट होत असल्याचे समोर आले आहे.

‘सिक्युरिटी डिपॉङिाट’च्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट
पुणो : सुरक्षिततेच्या नावाखाली हजारो रुपये ‘सिक्युरिटी डिपॉङिाट’ घेऊन विद्याथ्र्याची लूट होत असल्याचे समोर आले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, हे डिपॉङिाट परत मिळविण्यासाठीही विद्याथ्र्याना संबंधित महाविद्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे विद्याथ्र्याना भरुदड सोसावा लागत असताना,
संस्था मात्र त्यांच्या पैशांवर डल्ला मारत आहे.
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी अनेक महाविद्यालये विद्याथ्र्याकडून विविध कारणांसाठी शुल्क वसूल करतात. त्यामध्ये आता ‘सिक्युरिटी डिपॉङिाट’ची भर पडल्याचे नव्यानेच समोर आले आहे. शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असे बेकायदा शुल्क वसूल केले जात असल्याचे तेथील विद्याथ्र्यानी सांगितले. ‘प्रवेश घेताना आमच्याकडून 5 ते 1क् हजार रुपये सिक्युरिटी डिपॉङिाट घेण्यात आले. काही विद्याथ्र्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी लागली. तरीही डिपॉङिाटच्या नावाखाली घेतलेले पैसे परत करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे,’ असे काही विद्याथ्र्यानी सांगितले.
टोलेजंग इमारती, अत्याधुनिक तंत्रज्ञान, साधनसामग्री; तसेच जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जात असल्याने अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित होतात; तसेच महाविद्यालयांकडून मागण्यात आलेले शुल्कही हे विद्यार्थी भरतात. मात्र, आता यामध्ये सिक्युरिटी डिपॉङिाट किंवा इतर शुल्कांची भर पडतच चालली आहे. (प्रतिनिधी)
..तर चौकशी करू
शुल्क आकारणो हा महाविद्यालयाचा अंतर्गत प्रश्न आहे; मात्र ‘सिक्युरिटी डिपॉङिाट’ असे कोणतेही शुल्क घेण्याबाबत कोणताही नियम नाही. विद्याथ्र्यानी संबंधित महाविद्यालयाविरोधात लेखी तक्रार दिल्यास त्याची चौकशी केली जाईल.
- डॉ. व्ही. बी. गायकवाड,
बीसीयूडी, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ