देशी दारूच्या दुकानावर टाकला दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST2021-05-13T04:10:44+5:302021-05-13T04:10:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशी दारू दुकानमालक व मॅनेजरला पालघनसारख्या लोखंडी हत्याराने मारण्याची भीती दाखवून टोळक्याने गल्ल्यातील ३० ...

Robbery at a local liquor store | देशी दारूच्या दुकानावर टाकला दरोडा

देशी दारूच्या दुकानावर टाकला दरोडा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशी दारू दुकानमालक व मॅनेजरला पालघनसारख्या लोखंडी हत्याराने मारण्याची भीती दाखवून टोळक्याने गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पिट्या, हुक्या व इतर तीन साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रमेश पाटील (वय ५०, रा. दत्तनगर, तळजाई पठार) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांचे नऱ्हे चौकात देशी दारूचे दुकान आहे. दुकानात शिवप्रकाश अग्राणी हे मॅनेजर असतात. २४ फेब्रवारी रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पिट्या व त्याचे साथीदार दुकानात शिरले. त्यांनी मॅनेजर अग्राणी यांना पालघनने मारण्याची धमकी दिली. गल्ल्यातील सर्व पेसे दे, माझे नाव हुक्या आहे. नाही तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे शिवप्रकाश हे गल्ल्यापासून घाबरून बाजूला गेल्यावर पिट्याने गल्ल्यातील ३० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

या घटनेने घाबरून मॅनेजर शिवप्रकाश हा उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी गेला. रमेश पाटील हेही लातूरला आपल्या मूळगावी गेले होते. तेथून परत आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Robbery at a local liquor store