शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पालखीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:34 IST

पालखीच्या गर्दीमध्ये एखाद्याला हेरून त्याच्याकडील मोबाईल, सोनसाखळी अथवा पाकीट मारून ते आपल्या साथीदाराकडे पास करतात़.

ठळक मुद्देअहमदनगरचे टोळके : एक लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पालखीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाईल, सोनसाखळी, पाकीटमारी करणाऱ्या अहमदनगरच्या सहा जणांच्या टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. मोहन गोरख काळे (वय २७, रा़ राजेवाडी, ता़ जामखेड), सागर नवनाथ गिते (वय १८, रा़ बाभुळगाव, ता. पाथर्डी), अमोल बाबासाहेब गिते (वय २१, रा़ लोहसर, खाडगाव, ता़ पाथर्डी), रामेश्वर अंबादास जाधव (वय २२, रा़ शिरापूर, ता़ शिरूर कासार, जि़ बीड), धर्मराज मारुती मुंजाळ (वय ३८, रा. शिवनी, ता़ वडवाणी), हिरालाल सुखदेव जाधव (वय ३५, रा़ भोरवाडी, ता़ पाथर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. त्यांच्याकडून २ तोळ्यांची सोनसाखळी, आयफोन मोबाईल व साधा मोबाईल असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले, की लष्कर पोलीस ठाण्याचे तपास पथक पालखी बंदोबस्ताच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना हवालदार गणपत थिकोळे यांना माहिती मिळाली़. त्यानुसार कॅम्पमधील महावीर चौकात जाऊन त्यांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले़. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोबाईल, सोनसाखळी मिळून आली़. अधिक चौकशी केली असता त्यांनी पालखी सोहळ्यामध्ये विश्रांतवाडी, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गुन्हे केल्याची कबुली दिली़. ते सर्वजण एकत्र घोळक्याने फिरतात़. गर्दीमध्ये एखाद्याला हेरून त्याच्याकडील मोबाईल, सोनसाखळी अथवा पाकीट मारून ते आपल्या साथीदाराकडे पास करतात़. ही चोरी करत असताना कोणाच्या लक्षात येण्याच्या आत ते साथीदाराकडे चोरलेली वस्तू पास करत असल्याने कोणाच्या लक्षात येत नव्हते़ .अधिक तपासासाठी त्यांना विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे, हवालदार शैलेश जगताप, गणपत थिकोळे, प्रदीप शितोळे, अमोल शिंदे, अमोल राऊत, पवन भोसले, राहुल शिंगे, सागर हुवाळे, आबासाहेब धावडे, मुशरफ पठाण यांनी ही कामगिरी केली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीCrimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस