दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST2021-07-07T04:11:53+5:302021-07-07T04:11:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद ...

Robbery gang arrested | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले.

दत्ता रंगनाथ गायकवाड (वय २३), गौरव अर्जुन परजणे (वय २०), किशोर विश्वनाथ जाधव (वय २२), दत्ता बबन व्यवहारे (वय ३७, सर्व रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी कट्टा, सुरी, कोयता, मिरची पूड, २ दुचाकी असा १ लाख १५ हजार ७३६ रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

गुन्हे शाखेचे पथक हद्दीत गस्त घालत असताना लोणीकंद ते बकोरी रस्त्यावरील खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपींना ताब्यात घेतले.

अंधारात रस्त्याने येणारी-जाणारी वाहने तसेच पादचाऱ्यांना लुटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीत ते होते. दत्ता गायकवाड व किशोर जाधव या दोघांवर चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक गणेश माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Robbery gang arrested