कुरुळी : कुरुळी येथे भरदिवसा कुंभार भट्टी येथे एका लग्नघरामध्ये घुसून घरातील सदस्यांवर धारदार हत्याराने वार करुन घरातील ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. ऐश्वर्या बागडे, वैभव बाळासाहेब बागडे, स्वाती बागडे अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बागडे यांच्या कुटुंबातील एैश्वर्याचा ३० एप्रिल रोजी विवाह आहे. या आठवड्यात सलग चार दिवस बँकेला सुट्टी आहे. त्यामुळे बागडे कुटुंबाची लग्नाची लगबग सुरु आहे. गुरुवारी त्यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चडविला. धारदार हत्यारांनी या तिघांवर वार केले. त्यांना जखमी करुन घरातील ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. लग्नाची गडबड असल्याने घरामध्ये खरेदी झालेली होती. महागड्या वस्तू, पैसे आणि दागिने घरामध्ये ठेवलेले होते. चोरट्यांनी घरावर पाळत ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी घरात घुसल्यावर सर्वांना कोयत्याचा व बंदुकीचा धाक दाखवित खाली बसायला सांगितले. त्यांना विरोध करताच घरातील सदस्यांवर हल्ला चढविण्यात आला. जखमींवर चाकणच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कुरुळीमध्ये भरदिवसा बाजारपेठेत दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:32 IST
भरदिवसा कुंभार भट्टी येथे एका लग्नघरामध्ये घुसून घरातील सदस्यांवर धारदार हत्याराने वार करुन घरातील ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
कुरुळीमध्ये भरदिवसा बाजारपेठेत दरोडा
ठळक मुद्देलग्नाची गडबड असल्याने घरामध्ये खरेदी झालेली महागड्या वस्तू, पैसे आणि दागिने