शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खळबळजनक! चाकण पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकासह चौघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 20:21 IST

गुन्हा दाखल होताच फरार झाला फौजदार

चाकण : वाकी ( ता.खेड ) येथील टाटा कंपनीच्या गोदामातून स्पेअर पार्टचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी मोटारसायकल आडवी लावली. नंतर कंटेनर रोहकल गावच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन लुटल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकासह तीन चौघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.     याप्रकरणी कंटेनरचा चालक अंकुश लक्ष्मण केंद्रे ( वय.४०,रा.शिरसटवाडी,लातूर ) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार विनोद साहेबराव ठाकरे ( वय २८ रा. मेदनकरवाड़ी वेद हाईटस, प्लेंट नं. ए. /६ चाकण ), जितेंद्र रामभवन श्रीवास ( वय ३० , रा. आयटेल होम, चाकण ), रियाज अमीन इनामदार ( वय. २४ ,रा.ठाकुर पिंपरी ता.खेड ) यांच्यासह म्हाळुंगे पोलीस चौकीत नेमणुकीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 फिर्यादी हे कंटेनरमध्ये ( एमएच १२ पीके ५३०१) वाकी येथील टाटा कंपनीच्या गोदामातून स्पेअर पार्ट भरून रोहकल येथील सेफा एक्सप्रेस प्रा. लि. या कंपनीच्या गोदामामध्ये खाली करण्यासाठी जात असताना अचानक मोटार सायकलवरून आलेल्या अनोळखी चौघांनी कंटेनरला कट मारून मोटार सायकल आडवी लावली. तसेच जबरदस्तीने कंटेनर निर्जनस्थळी नेऊन त्यातील टाटा कंपनीचे २७ लाख ९ हजार ४६९ किंमतीचे स्पेअर पार्ट व फिर्यादी जवळील १५०० रोख रक्कम असा ऐवजाची चोरी केली. 

संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने आरोपींना गुन्हा कसा करायचा? दरोड्याच्या मुद्देमालाची विल्हेवाट कशी व कोठे लावायची ? अशाप्रकारे दरोडयाची आखणी केली. तसेच वरील आरोपींबरोबर गुन्हा घडण्याचे पूर्वी व गुन्हा घडल्यानंतर मोबाईलवर बोलणे झाले असल्याचे देखील तांत्रिक तपासात समोर आल्याचे समजताच पासलकर फरार झाला आहे.   पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ,सहा.पोलीस आयुक्त रामचंद जाधव मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी यांनी केलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे हे करत आहेत.------------------------------------------------------

टॅग्स :ChakanचाकणPoliceपोलिसRobberyचोरी