शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन हतबल...! महापालिकेच्या वाहनतळांवर अजूनही लूट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:36 IST

- वाहनचालकांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसुली

- हिरा सरवदे पुणे : महापालिकेच्या मंडई परिसरातील वाहनतळांवर प्रशासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क वसुली होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मागील आठवड्यात प्रसिद्ध केले. याची दखल घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वाहनतळांची पाहणी केली. मात्र, अधिकाऱ्यांची पाठ फिरताच या वाहनतळांवर पुन्हा लूट सुरू झाली आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळे ठेकेदारांपुढे महापालिकेचे अधिकारी हतबल झाल्याचे सिद्ध होत आहे.महापालिकेने नागरिकांसाठी शहरात ३० वाहनतळ उभारले आहेत. हे वाहनतळ निविदा काढून ठेकेदारांना चालविण्यासाठी दिले आहेत. नागरिकांच्या गर्दीनुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा झोनमध्ये वाहनतळांची वर्गवारी केली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. तसेच या परिसरात अनेक महत्त्वाची गणेश मंदिरे आहेत. बाजारपेठ व मंदिरांमध्ये येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्किंग करण्यासाठी महापालिकेने मंडई परिसरात सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळ, हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ आणि लक्ष्मी रस्ता परिसरात शिवाजीराव कृष्णाराव आढाव (हमालवाडा) वाहनतळ अशी वाहनतळांची उभारणी केली आहे.हे वाहनतळ ‘झोन-क’मध्ये मोडत असल्याने महापालिकेने येथील शुल्क दुचाकीसाठी ३ रुपये आणि चारचाकीसाठी १४ रुपये असे निश्चित केले आहे. मात्र, येथील ठेकेदार वाहनचालकांकडून प्रतितास चार ते पाचपट शुल्क उकळत होते. महापालिकेने निश्चित केलेल्या शुल्काचा उल्लेख असणारा फलक दर्शनी भागात लावण्याचे बंधन असतानाही दरफलक दिसत नव्हते. शिवाय कोणालाही शुल्क घेतल्यानंतर पावती दिली जात नव्हती.यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वाहनतळांची पाहणी केली. यावेळी गायब असलेले दरपत्रक झळकले पाहायला मिळाले. तसेच त्यांनी नेलेल्या पिवळ्या नंबरप्लेटच्या चारचाकी गाडीला नियमानुसार शुल्क आकारून चालकाला पावतीही दिली.मात्र, अधिकाऱ्यांची पाठ फिरताच संबंधित ठेकेदारांकडून पुन्हा वहानचालकांची लूट सुरू झाली. लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीमध्ये मिसाळ वहानतळात कुठेही शुल्काचा फलक दिसला नाही. स्वच्छतेचे फ्लेक्स मात्र जागोजागी दिसतात. या ठिकाणी आजही वाहनचालकांकडून निघेल तेव्हढे पार्किंग शुल्क वसूल केले जाते. या ठिकाणी मंगळवारी तीन ते चारच्या सुमारास एका दुचाकीला नियमानुसार तीन रुपये एका तासाला घेतले. तर दुसऱ्या एका दुचाकीला दोन तासांसाठी वीस रुपये घेतले. तर एका चारचाकीसाठी दोन तासांसाठी शंभर रुपये घेतले. तर दुसऱ्या एका चारचाकीला दीड तासासाठी ८० रुपये घेतले.तसेच बाबू गेणू पार्किंगमध्ये एका ठिकाणी महापालिकेचा शुल्कासंबंधी फ्लेक्स आहे. एका काॅलमवरही शुल्क लिहिलेले आहे. तरीही वाहनचालकांकडून जास्तीचे शुल्क घेतले जाते. या ठिकाणी मंगळवारी चारच्या सुुमारास जास्तीचे महापालिकेच्या दरानुसार शुल्क घेण्यावरून दोन दुचाकीचालकांनी विचारणा केली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्या दुचाकीस्वारांसोबत वाद घातले. गाडी पार्किंग करा म्हणून बोलवायला आलो नव्हतो, मागेल तेवढे पैसे द्यावे लागतील, असे येथील कर्मचारी बोलले. सोबत महिला व इतर लोक असल्याने संबंधितांनी फारसा वाद न घालता दहा रुपये देऊन निघून जाणे पसंद केले. या ठिकाणी चारचाकीसाठीही तासाला ५० रुपयांच्या आसपास शुल्क घेतले जात असल्याचे निदर्शनास आले.अधिकारी हतबलवाहनतळांमध्ये अजूनही लूट सुरूच आहे. यासंदर्भात आपण काय कारवाई करणार, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. नंतर बोलतो, असे म्हणत बोलणे टाळले. त्यामुळे अधिकारी ठेकेदारांपुढे हतबल झाल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcivic issueनागरी समस्याMuncipal Corporationनगर पालिका