तंबाखूच्या बहाण्याने तरुणाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:11 IST2021-05-25T04:11:04+5:302021-05-25T04:11:04+5:30

पुणे : ‘अहो तंबाखू आहे का ? ’ अशी रस्त्याने चाललेल्या तरुणाला विचारणा करीत बोलण्यात गुंतवून दुचाकीस्वार चोरट्यांनी २० ...

Robbed the young man under the pretext of tobacco | तंबाखूच्या बहाण्याने तरुणाला लुटले

तंबाखूच्या बहाण्याने तरुणाला लुटले

पुणे : ‘अहो तंबाखू आहे का ? ’ अशी रस्त्याने चाललेल्या तरुणाला विचारणा करीत बोलण्यात गुंतवून दुचाकीस्वार चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना १५ मे रोजी कोंढव्यातील इंदिरानगरमध्ये घडली. याप्रकरणी महम्मद सद्दाम हुसेन (वय २८, रा. वानवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मेला महम्मद आणि त्यांचे मित्र दुपारच्या सुमारास कामावर पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महम्मद यांना हाक मारून तुमच्याकडे तंबाखू आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर चोरट्यांनी महम्मद यांच्यासोबत गप्पा मारण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडील आणि मित्र परवेज यांचा असे दोन मोबाईल हिसकावून नेले. महमंद आणि त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खेतमाळीस तपास करीत आहेत.

Web Title: Robbed the young man under the pretext of tobacco