शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

नागरिकांच्या सतर्कतेने घरफोडी करणाऱ्या महिला जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:12 IST

भंगार गोळा करत असल्याचा बहाणा करुन त्या दोघी बंगल्यामध्ये जाऊन पाणी मागत असत़ बंगला बंद दिसला की नंतर साथीदारांना घेऊन येत घरफोडी करत होत्या.

ठळक मुद्देअलंकार पोलिसांची कामगिरी : १४ लाखांचा ऐवज जप्तचौकशीत ९ घरफोड्या केल्याचे उघडकीस

पुणे : नागरिकांकडून मिळणारी माहिती किती महत्वाची ठरू शकते, याचे उदाहरण अलंकार पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले़. भंगार गोळा करत असल्याचा बहाणा करुन त्या बंगल्यामध्ये जाऊन पाणी मागत असत़ बंगला बंद दिसला की नंतर साथीदारांना घेऊन येत घरफोडी करत होत्या. अशाप्रकारे त्या दोघी कर्वेनगरमधील स्वप्न मंदिर सोसायटीत रेकी करत होत्या़, तेथील नागरिकांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे आपला संशय व्यक्त केला़. त्यानंतर अलंकार पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी ९ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे़. अनु पवन आव्हाड(वय २५, रा़ वर्ल्ड ट्रेडसमोर, खराडी), प्रकाश अंबादास आव्हाड (वय ३४), पुजा प्रकाश आव्हाड/ पुजा दिलीप गुप्ता (वय ३८) अनिता कैलास बोर्डे (वय ४२, सर्व रा़ दिवा, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ त्यांच्याबरोबरच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे़. अंलकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५, डेक्कन २, शिवाजीनगर आणि ठाणे येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा ९ दिवसा घरफोड्या उघडकीस आल्या असून त्यांच्याकडून ३३१ गॅ्रम वजनाचे सोने व ७ किलो ५३२ ग्रॅम चांदीच्या लगडी असा एकूण १४ लाख २९ हजार १६२ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़. त्यांच्याकडून दागिने विकत घेणाऱ्या मुबारक उमर खान (वय ४१, रा़ गोवंडी, मुंबई) यालाही अटक करण्यात आली आहे़. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांनी माहिती दिली़ ते म्हणाले, या महिला अगोदर जाऊन परिसरातील बंद बंगले कोणते आहेत़ याची रेकी करायच्या. त्यासाठी त्या भंगार विकत घेत असल्याचा बहाणा करत होत्या. बंगला खरंच बंद आहे का याची खात्री करण्यासाठी पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने आत जात असत. बंगला बंद दिसल्यावर त्या तिघी आपला साथीदार व लहान मुलांना बोलावून घेत असत़. बंगल्याचे पुढच्या दाराऐवजी मागच्या बाजूला असलेले किचनचे दार, खिडकीचे गज वाकवून त्यातून लहान मुलाला आत पाठवत़. त्यानंतर तो मुलगा दरवाजा उघडून त्यांना आत घेत़. घरातील सोन्याचे दागदागिने चोरल्यानंतर आल्या वाटे ते परत जात असत़. त्यामुळे तेथे चोरी झाल्याचे बाहेरुन कोणाला समजत नसे़. महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याचदिवशी एका ठिकाणी घरफोडी झाली होती़. तीसुध्दा यांनीच केली असावी अशा संशयावरुन ते ठिकाणी आणि यांचे मोबाईलचे लोकेशन पडताळून पाहिल्यावर लक्षात आले़. त्यातून खोलात जाऊन चौकशी केल्यावर त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली़. पोलीस उपायुक्त डॉ़. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, उपनिरीक्षक अंबरिश देशमुख, राजेंद्र सोनावणे तसेच पोलीस कर्मचारी नितीन कांबळे, उस्मान कल्याणी, बाबुलाल तांदळे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे यांनी ही कामगिरी केली़. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाtheftचोरीPoliceपोलिसWomenमहिला