गर्दीने ओसांडून वाहत आहेत रस्ते, चौक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:16+5:302020-12-04T04:30:16+5:30
अमोल यादव बारामती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट समोर असताना बारामती शहरात मात्र प्रत्येक चौक, रस्ता गर्दीने ओसांडून वाहत ...

गर्दीने ओसांडून वाहत आहेत रस्ते, चौक
अमोल यादव
बारामती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट समोर असताना बारामती शहरात मात्र प्रत्येक चौक, रस्ता गर्दीने ओसांडून वाहत आहेत. त्यात नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रूग्ण संख्येच्या वाढलेल्या आकडेवाडीवरून प्रशासन देखील नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.
शहरात कोरोना संसर्गामुळे शंभरहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. शासनाच्या सूचनांप्रमाणे नागरिकांनी खबरदारी देखील घेतली होती. सध्या बाजारपेठेत मात्र नागरिक कोणतीही काळजी न घेता निष्काळजीपणे फिरत आहेत. आता सुरू झालेल्या लगीनसराईमुळे बारामती तालुका व आसपासच्या तालुक्यातून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत. पेठेतील कापड व्यवसाय, सराफ व्यवसाय, किराणा भुसार, हॉटेल व्यवसाय येथे सोशल डिस्टन्स पळाला जात नसल्याचे चित्र आहे. तसेच इतर दुकानदार मात्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दुकानात सॅनिटायजर असणे, मास्क वापराने याकडे दुर्लक्ष केले जाते आहे.तर व्यापारी कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. नागरिक चौकात पोलीस असल्याने तात्पुरते मास्क लावतात तर पुढे काढून टाकतात शहरात कोरोना बधितांची संख्या कमी झाली होती. मात्र काही दिवसांपासून कोरोना बधितांची संख्या आता पन्नासच्या वर गेली आहे. तर नागरिक कोरोनाच्या बाबतीत गाफील राहत आहेत. काही नागरिक आता बंद ठेवणे किंवा घरात बसने परवडणारे नाही असे सांगत आहेत. पेठेत रोजची गर्दी झाली असून नागरिक निवांत फिरत आहेत. मोठ्या संख्येने लोक बाहेरच्या शहरात पर्यटनासाठी जात असुन बाहेरचे लोक देखील शहरात येत आहेत. त्यांची कोणतिही तपासणी प्रशासनाच्यावतीने केली जात नाही. तसेच नोंदही ठेवली जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी येत्या काही दिवसात बारामतीमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत आहेत. दररोज ५५ कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. सध्या ९० रुग्ण उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या बाबतीत गाफील न राहता शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
- सदानंद काळे
वैद्यकीय अधीक्षक बारामती
बारामती शहरात कोरोना संसगार्चा रुग्ण आढळल्यास बारामती नगर पालिकेच्या वतीने त्या ठिकाणी निजंर्तुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांपर्यंत शासनाच्या खबरदारीचा सूचना पोहचवन्याचे काम अविरतपणे सुरू आहे. नागरिकांनी देखील खबरदारी घेऊन सॅनिटायजर, मास्क, फिजीकल डिस्टन्स पाळावा शहरात स्वच्छता पाळावी.
- कुंदन लालबीगे
आरोग्य सभापती बारामती नगर परिषद
———————————
फोटो ओळी : बारामती शहरातील भिगवण चौक येथे नियमित असणारी गर्दी.
०३१२२०२०-बारामती-१०
——————————————