शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वारी काळात दिवे घाटातील रस्त्याचे काम राहणार बंद; वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:50 IST

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून सासवड पालखी तळ व महामार्ग पाहणी : वॉटरप्रूफ मंडप उपलब्ध करून दिले जातील

सासवड : ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व सासवड पालखी तळाची पाहणी केली. यात पालखी मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणांचा समावेश होता. यंदाच्या वारीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर स्नानगृहे व शौचालयांची व्यवस्था केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी जाहीर केले. तसेच, पावसापासून बचावासाठी ठिकठिकाणी एकाच वेळी पाच हजार वारकऱ्यांना उभे राहता येतील असे वॉटरप्रूफ मंडप प्रथमच उपलब्ध करून दिले जातील, ज्यात मेडिकल आणि मसाजची सोय असेल. सासवड येथील पालखीतळ यापूर्वीच चांगला विकसित करण्यात आल्यामुळे येथे काही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक मुक्काम स्थळांवर झालेल्या नुकसानीची दखल घेत, तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश गोरे यांनी प्रशासनाला दिले. या दौऱ्याचा मुख्य उद्देश पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करणे हा होता असे गोरे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार राहुल कुल, विजय शिवतारे, विशेष कार्य अधिकारी एम. एस. घुले, दादासाहेब कांबळे, प्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जालिंदर कामठे, अशोक टेकवडे, पालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, अजित जगताप, आनंद जगताप, मोहन चव्हाण यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमती द्विवेदी यांनी माहिती दिली की, घाट रस्त्यात पालखी महामार्गाचे काम चालू असल्यामुळे सुरक्षेसाठी सध्याच्या रस्त्याचे बॅरिकेटिंग केले आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचे काम सुरू असून दिवे घाटातील कचरा काढण्यात आला आहे. 

दिवे घाटात कामाची सूचना -

दिवे घाटात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासंदर्भात, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, सध्या नवीन काम थांबवून हाती असलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी येथे बॅरिकेड्सची व्यवस्था करण्याबाबतही निर्देश दिले आहेत. पालखी सोहळा पुढे गेल्यावर पुन्हा काम सुरू केले जाईल, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड