शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोच्या हमीभावासाठी रस्त्यावर उतरणार : बाबा आढाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:37 IST

शेतीमालास भाव मिळत नाही. परिणामी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतीमालाला हमीभाव देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देबाजार समिती कार्यालयासमोर २३ एप्रिल रोजी निदर्शनेटोमॅटोला किमान ५० टक्के हमीभाव द्यावा अशी मागणी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे या पिकाचा झालेला खर्च निघणे देखील कठीण झाले असून, शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने स्वामिनाथ आयोगाने सुचविलेल्या तुरतुदीप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित टोमॅटोला किमान ५० टक्के हमीभाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेत केली. शेतक-यांचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी बाबा आढाव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण आणि सचिव संतोष नांगरे, माजी अध्यक्ष संजय साष्टे, फलटण तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी जितेंद्र जाधव, जयराम थोरात उपस्थित होते. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारी (दि. २३) रोजी मार्केट यार्डातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांसह हमाल, मापाडी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.डॉ. आढाव म्हणाले, शेतीमालास भाव मिळत नाही. परिणामी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतीमालाला हमीभाव देणे आवश्यक आहे. टोमॅटो, कोथिंबिर आणि कांद्याच्या बाबतीत ही परिस्थिती नेहमी उद्भवते . किमान या तीन शेतीमालांना हमीभाव देणे अपेक्षित आहे. सुरूवात टोमॅटो पासून करावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पाठविण्यात आले आहे. या शेतमालाच्या हमीभावासाठी राज्यातील ३०० हून अधिक बाजार समित्यांनी हमीफंड उभारावा. यास राज्य सरकारने मदत करावी. जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल़. टोमॅटोपासून सॉस बनविला जातो. सॉसची किमान १०० रुपये किलो भावाने विक्री होते. हा बनविण्यासाठी फक्त २० रुपये खर्च येतो. हा बनविणाऱ्यांना इतका नफा मिळतो. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. यात हस्तक्षेप करून सरकारने टोमॅटोल त्वरित हमीभाव द्यावा असे नागरे यांनी सांगितले. तर शेतकरी जयराम थोरात यांनी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याऐवजी हमीभाव देण्याची मागणी यावेळी केली.

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावFarmerशेतकरी