शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर रास्ता रोको; शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मंत्रालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:36 IST

'सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण', 'सरकारची दिवाळी मात्र शेतकऱ्यांचा शिमगा' अशा विविध घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला

शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्गावर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. 'जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची', 'लढा ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी, लढा आमच्या हक्कासाठी', 'पाणी नाही तर जमीन नाही', 'सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण', 'सरकारची दिवाळी मात्र शेतकऱ्यांचा शिमगा' अशा विविध घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. दरम्यान रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. तर आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.            खेड तालुक्यातील चासकमान, भामा आसखेड धरण अंतर्गत खेड तालुक्यातील काळूस भागातील २५ पेक्षा अधिक गावातील शेतजमिनीवर ४० वर्षापासून पुनर्वसनाचे शिक्के टाकले आहेत. प्रत्यक्षात कालव्याद्वारे येणारे पाणी या भागाला येत नाही. कालवे रद्द झाले आहे. लाभ क्षेत्रात ही गावे येत नसताना अन्यायकारक पद्धतीने हे शिक्के तसेच ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन विकणे, कर्ज काढणे, जमिनीचे कुटुंबातवाटप करणे, दलालान मार्फत जमिनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणे यासारख्या अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.          यापार्श्वभूमीवर काळूस येथे मागील काही दिवसांपासून साखळी उपोषणाद्वारे आंदोलनही सुरू आहे. मात्र शासन आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत नसल्याने माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली भोसे येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. शेतकऱ्यांनी बैलगाड्या व जनावरे घेऊन रस्त्यावर तासभर ठिय्या मांडला. आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य रयत क्रांती युवा आघाडीचे अध्यक्ष सागर खोत, महाराष्ट्र राज्य रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, माजी उपसभापती ज्योती आरगडे, मनोहर वाडेकर, डॉ. बाळासाहेब माशेरे, सुभाषराव पोटवडे, नवनाथ आरगडे, बाजीराव लोखंडे, मोहन पवळे यांनी मनोगते व्यक्त करून तीव्र भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मंत्रालयाला घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय देखील घेण्यात येणार असल्याचे इशारा देण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीagitationआंदोलनFarmerशेतकरीGovernmentसरकार