शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ' सडक से संसद ' लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:43 IST

काम करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क व्हावा यासाठी आम्ही लढू. तसेच केंद्राच्या निर्गुंतवणूक धोरणास आमचा विरोध राहील.असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मेडिकल कार्ड मिळावे, अशी मागणी आहे.

ठळक मुद्दे केंद्राच्या निर्गुंतवणूक धोरणास आमचा विरोध तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मेडिकल कार्ड मिळावे, अशी मागणी

पुणे :कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ' सडक से संसद ' लढा दिला जाणार असल्याची घोषणा ( राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस )  'इंटक ' चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्र प्रदेश इंटक ची राज्य कार्यकारिणी बैठकीत ही माहिती देण्यात आली.   चौधरी म्हणाले, ' कामगारांना न्याय देण्यात मोदी सरकार अयशस्वी ठरले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून बेरोजगारी वाढली आहे. कारखाने बंद होऊन कामगारांना गावी जाऊन मजुरी करावी लागत आहे, त्यामुळेच मनरेगामध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे. कामगारांच्या मागण्यासाठी इंटक सडक से संसद ' लढा देणार आहे. त्याचा भाग म्हणून आॅगस्टमध्ये मुंबईत कामगार अधिवेशन आयोजित केली जाणार आहे. मोदी सरकारला कामगार विषयक ४४ कायदे कमी करून त्यांची संख्या ४ वर आणायची आहे. त्यामुळे कामगारांचा आवाज दाबला जाणार आहे. याला  संघटनेचा विरोध आहे. मजूराला प्रतिदिन किमान ५०० रुपये मजूरी दिली जावी अशी आमची मागणी आहे. कामगार, मजुरांचे काम कायमस्वरूपी व्हावे, असंघटित कामगार क्षेत्राला ५ हजार प्रतिमहिना पेन्शन मिळावी, संघटीत क्षेत्रातील कामगारांना प्रतिमहिना २ हजार रुपये पेन्शन मिळावी, अशी आमची मागणी आहे. काम करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क व्हावा यासाठी आम्ही लढू. तसेच केंद्राच्या निर्गुंतवणूक धोरणास आमचा विरोध राहील.असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मेडिकल कार्ड मिळावे, अशी मागणी आहे.  या पत्रकार परिषदेला प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे,  प्रदेश सरचिटणीस पराग आठवले ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तेजंदरसिंग अहलूवालिया उपस्थित होते

टॅग्स :PuneपुणेEmployeeकर्मचारीcongressकाँग्रेसBJPभाजपा