सुुरक्षा कठडेच नसल्याने रस्ता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:42 IST2018-08-26T23:42:06+5:302018-08-26T23:42:28+5:30
रेठवडी येथील समस्या : अनेक वर्षांपासूनची मागणी

सुुरक्षा कठडेच नसल्याने रस्ता धोकादायक
दावडी : रेटवडी (ता. खेड) येथील ओढ्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षाकठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. हा रस्ता धोकादायक बनला असून संरक्षक लोखंडी कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
खेड-कनेरसर ह्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन रस्ता प्रशस्त बनला आहे. याच रस्त्यावरून रेटवडी गावात जाण्यास फाटा आहे. गावात जाणारा रस्ता ओढ्यालगत आहे. या ओढ्याला पावसाळ्यात, तसेच उन्हाळ्यात चासकमान धरणाच्या डाव्या कालवा गळतीचे पाणी वाहत असते. अनेक वेळा या ओढ्याला पूर आल्यामुळे रस्त्याचा भराव वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हा रस्ता वळणावळणाचा आहे. बाहेरगावच्या वाहनचालकांना, दुचाकी चालविणाºयांना अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालक या ओढ्यात पडून गंभीररीत्या जखमी झाले आहेत. रस्त्यावरून रेटवडी, खरपुडी येथील ग्रामस्थांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच शालेय विद्यार्थी, कामगार येथूनच ये-जा करीत असतात. ओढ्याच्या बाजूने रस्त्याला सुरक्षा कठडे बसविण्याची गरज आहे. त्यामुळे कठडे बसविण्यात यावेत, अशी मागणी उपसरपंच नामदेव डुबे, माजी सरपंच दिलीप पवळे, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश वाबळे व ग्रामस्थांनी केली आहे.
अनेकवेळा ओढ्याला पूर आल्यामुळे रस्त्याचा भराव वाहून गेल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. रस्ता वळणावळणाचा असल्यामुळे बाहेरगावच्या वाहनचालकांचा अनेकवेळा झाला अपघात. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरुन परिसरातील ग्रामस्थांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ विद्यार्थी, कामगार यांच्या जीवाला धोका