शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत आचार्य कुटुंबियांच्या अपघातानंतर रास्तारोको आंदोलन; सुरक्षित रस्त्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 20:33 IST

Baramati News: आचार्य कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या बारामतीकरांनी सोमवारी (दि. २८) रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात सकाळी ११ वाजता नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

बारामती - आचार्य कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या बारामतीकरांनी सोमवारी (दि. २८) रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात सकाळी ११ वाजता नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या भागातील रस्त्यावर गतीरोधक (स्पीडब्रेकर) बसवण्याची मागणी करत, उदासीन प्रशासनामुळे हा अपघात घडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सुमारे दोन तास चाललेल्या या रास्तारोको आंदोलनानंतर प्रशासनाने गतीरोधकाचे काम सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

रविवारी खंडोबानगर परिसरात घडलेल्या भीषण अपघातात आचार्य कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यापूर्वीही या भागात चार ते पाच अपघात घडले असून, पुणे शहरातून येणाऱ्या वाहतुकीमुळे येथे नेहमीच वर्दळ असते. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने गतीरोधक बसवण्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. आंदोलकांनी अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच डंपरचालक आणि मालकावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

प्रशासनाचा प्रतिसादप्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गतीरोधकाचे काम तातडीने सुरू होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. नावडकर यांनी पावसाळ्यात हॉटमिक्स प्रकल्प बंद असल्याचे सांगितले, परंतु डांबर उपलब्ध करून सायंकाळी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, काम सुरू झालyanंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले, अशी माहिती खंडोबानगर येथील आंदोलक चंदू लोंढे यांनी दिली.

प्रांताधिकाऱ्यां निवेदनखंडोबानगर येथील या अपघाताने बारामतीकरांचे मन हेलावले आहे. भविष्यात सुरक्षित प्रवास आणि अपघातमुक्त बारामतीसाठी, शहरातील विविध भागांतून नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मंगळवारी (दि. २९) सकाळी रिंग रोड येथील नवीन प्रशासकीय भवनात सर्व बारामतीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त बारामतीकरांनी केले आहे.

टॅग्स :AccidentअपघातBaramatiबारामतीPuneपुणे