महापालिका उभारणार ‘आरएमसी प्लान्ट’
By Admin | Updated: July 8, 2015 02:41 IST2015-07-08T02:41:40+5:302015-07-08T02:41:40+5:30
शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे होत असल्याने त्यासाठी लागणारे रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) खासगी ठेकादारांकडून खरेदी न करता त्याचा स्वतंत्र

महापालिका उभारणार ‘आरएमसी प्लान्ट’
पुणे : शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे होत असल्याने त्यासाठी लागणारे रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) खासगी ठेकादारांकडून खरेदी न करता त्याचा स्वतंत्र प्रकल्प महापालिका प्रशासनाकडून उभारला जाणार आहे. त्यासाठी
जागा शोधण्याचे आदेश स्थायी समितीने महापालिका प्रशासनास
दिले असून, महापालिकेच्या मालकीच्या हॉटमिक्स प्लान्टच्या धर्तीवर हे आरएमसी प्रकल्प असणार आहेत. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेकडून शहरात दरवर्षी शेकडो किलोमीटर डांबरी रस्ते तयार केले जातात. त्यानंतर या रस्त्यांच्या देखभाली व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले डांबर आणि खडीचे
मिश्रण तयार करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा हॉटमिक्स प्लान्ट येरवडा येथे आहे.
या वेळी शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते करण्याचे काम सुरू असून, त्याच्या देखभालीसाठी तसेच या रस्त्यांसाठी लागणारे खडी आणि सिमेंटचे मिश्रण खासगी कंपन्यांकडून न घेता, असा प्रकल्प महापालिकेनेच स्वत: करावा, अशी मागणी अनेक समिती सदस्यांनी केली.
त्यानुसार, असा प्रकल्प उभारणे शक्य आहे का, तसेच त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे जागा आहे का, याची माहिती समितीस सादर करण्याच्या सूचना प्रशासनास
दिल्या असल्याचे कदम यांनी सांगितले.(प्रतिनिधी)