नदी सुधार योजना: नदीपात्रात ७० किमीची वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:09 AM2018-05-09T04:09:59+5:302018-05-09T04:09:59+5:30

मुळा-मुठा नदीसंवर्धन योजनेअंतर्गत विविध ठिकाणांहून येणारे मैलापाणी एकत्र करण्यासाठी जवळपास ७० किमी मुख्य मैलापाणी वाहिनी आणि ४३ किमीच्या उपवाहिन्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

 River improvement plan: 70 kms duct in river basin | नदी सुधार योजना: नदीपात्रात ७० किमीची वाहिनी

नदी सुधार योजना: नदीपात्रात ७० किमीची वाहिनी

Next

पुणे - मुळा-मुठा नदीसंवर्धन योजनेअंतर्गत विविध ठिकाणांहून येणारे मैलापाणी एकत्र करण्यासाठी जवळपास ७० किमी मुख्य मैलापाणी वाहिनी आणि ४३ किमीच्या उपवाहिन्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. स्थायी समितीसमोर सल्लागार कंपनीच्या वतीने मंगळवारी सादरीकरण करण्यात आले. जपानधील जायका कंपनीने या कामासाठी ९०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून केंद्र सरकारने त्याची हमी घेतली आहे व त्यात ८५ टक्के अनुदानही केंद्र सरकारच देणार आहे.
प्रकल्पाचा एकूण खर्च ९९० कोटी २६ लाख रुपये इतका आहे. त्यातील ८५ टक्के म्हणजे ८४१.७२ कोटी रुपये केंद्र सरकार अनुदान म्हणून देणार आहे. महापालिकेचा यातील हिस्सा १४८ कोटी ५४ लाख रुपये आहे. २०१८ मध्ये काम सुरू होईल व ते सन २०२३ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. मुळा-मुठा नदीतील पाण्याचे प्रदूषण कमी करून पाण्याची, तसेच नदीच्या परिसंस्थेची गुणवत्ता सुधारणे हा महत्त्वाचा उद्देश या योजनेमागे आहे. त्याशिवाय त्याअनुषंगाने इतरही अनेक कामे यात करण्यात येतील. पुणे शहर आणि परिसराचे स्वच्छता आणि आरोग्य संवर्धनासाठी विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयनिर्मिती करणे, संस्थात्मक आणि नागरी प्रबोधन, संस्थात्मक सक्षमीकरण, प्रकल्पाच्या दीर्घकालीन यशस्वितेकरिता जनजागृती करणे व मुख्य म्हणजे नदीमध्ये येणारे सांडपाणी थांबवणे या कामांचा त्यात समावेश आहे.
मुख्य मलवाहिनी व त्याला जोडून उपवाहिन्याही यात तयार करण्यात येणार आहे. तसेच मैलापाणी शुद्धीकरण करणाऱ्या ११ नव्या केंद्रांची बांधणीही यात करण्यात येणार आहे. ३९६ दशलक्ष लिटर इतक्या मैलापाण्यावर रोज शुद्धीकरण प्रक्रिया केली जाणार आहे. जपानमधील तंत्रज्ञान वापरून हे काम करण्यात येईल. या सर्व केंद्रांच्या सलग १० वर्षे देखभालदुरुस्तीची जबाबदारीही काम करणाºया ठेकेदार कंपनीवरच सोपविण्यात आली आहे.
योजनेचे काम सुरू करण्यात आले असून बाणेर येथे मैलापाणी वाहिन्या बांधणे सुरू झाले आहे. एकूण ४३ किलोमीटरच्या वाहिन्या बांधण्यात येत आहेत. नदीच्या डाव्या (३३ किमी) व उजव्या (३७.६ किमी) किनाºयांकडील मैलापाणी वाहिन्यांच्या निर्मितीचे सर्वेक्षण व डिझाईनचे काम सुरू आहे, ठेकेदारांच्या पात्रता निकषाबद्दलची कागदपत्रे जायकाला पाठविण्यात आली आहेत. केंद्र सरकारकडून खर्चासाठी म्हणून आतापर्यंत ५७ कोटी ७४ लाख रुपये पालिकेला प्राप्त झाले असून त्यातील २७ कोटी ५३ लाख रुपये खर्च झाले आहेत.

११ नवीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे

- प्रकल्पाअंतर्गत ११ नवीन मैलापाणी शुद्धीकरण
केंद्रांची निर्मिती
- ३९६ दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढ्या मैलापाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया
- नवीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील पाण्याची गुणवत्ता पुढीलप्रमाणे असेल - १० एमजी/एल बीओडी, १० एमजी/एल टीएसएस, तसेच नायट्रोजन व फॉस्फरस काढणे
- अस्तित्वात असणाºया चार पंपिंग स्टेशनमध्ये सुधारणा करणे
- प्रकल्पातील नव्या व जुन्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनमध्ये केंद्रीय
स्काडा सिस्टिम बसवून
पाण्याचा प्रवाह, गुणवत्ता
आणि क्रियाशीलता
तपासणे

Web Title:  River improvement plan: 70 kms duct in river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.