पुणे - कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशालाही गवसणी घालता येते हे जवळे (ता. आंबेगाव) येथील ऋषिकेश संजय खालकर या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणाऱ्या सीए (सनदी लेखापाल) ची परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली असून त्याच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संजय सदाशिव खालकर यांचा ऋषिकेश हा मुलगा, त्याचे प्राथमिक शिक्षक जवळे गावातील प्राथमिक शाळेत झाले तर दहावीपर्यंत शिक्षण निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयात झाले तर बारावी, बी. कॉम व एम. कॉम हे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज पुणे या ठिकाणी झाले.
ऋषिकेश खालकर म्हणाले की, यश मिळविण्यासाठी माझी आई सुरेखा संजय खालकर, वडील संजय सदाशिव खालकर यांच्या नातेवाईकांचे सहकार्य लाभले.