‘सही’ने केला अनेक उमेदवारांचा घात

By Admin | Updated: February 6, 2017 06:12 IST2017-02-06T06:12:35+5:302017-02-06T06:12:35+5:30

उमेदवारी अर्ज भरताना अनेक शपथपत्रे, वेगवेगळी माहिती गोळा करण्यात उमेदवार व त्यांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून झटत होते़

The 'right' did the execution of many candidates | ‘सही’ने केला अनेक उमेदवारांचा घात

‘सही’ने केला अनेक उमेदवारांचा घात

पुणे : उमेदवारी अर्ज भरताना अनेक शपथपत्रे, वेगवेगळी माहिती गोळा करण्यात उमेदवार व त्यांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून झटत होते़ हे सर्व केल्यानंतर मुख्य उमेदवारी अर्ज भरताना अनेकांची धांदल उडाली़ त्यात घाईगडबडीत अर्जावर सही करण्याचेच राहून गेले, त्यामुळे बहुसंख्य इच्छुकांची निवडणूक लढविण्याची इच्छा अपुरी राहिली़
महापालिका निवडणुकीत प्रथमच आॅनलाईन अर्ज भरण्याची आलेली वेळ आणि राजकीय पक्षांनी शेवटपर्यंत उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या नाहीत़ त्यामुळे शेवटच्या दिवशी बहुसंख्य उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली़ त्यात अनेकांना आपला उमेदवारी अर्ज तपासून घेता आला नाही़ त्यामुळे गडबडीत त्यात काही त्रुटी राहिल्या़ अनेकांनी इतरांच्या मदतीने आॅनलाईन अर्ज भरून घेतला व त्याची प्रिंट काढून तो तसाच सादर केला़ त्यामुळे अर्जाची प्रत सादर करताना त्यावर सही करायचे राहून गेल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याशिवाय अधिकाऱ्यांपुढे पर्यायच नव्हता़ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ७ दिवसांचा अवधी दिला होता़ (प्रतिनिधी)

Web Title: The 'right' did the execution of many candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.