रिक्षा-टेम्पो अपघातात ३ ठार, २ जखमी
By Admin | Updated: August 13, 2015 04:43 IST2015-08-13T04:43:37+5:302015-08-13T04:43:37+5:30
औंधकडून काळेवाडी फाट्याकडे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा आणि कुरिअर वाहतुकीचा विशालनगर (वाकड) येथून पुण्याकडे जाणारा टेम्पो यांची जगताप डेअरी चौकात धडक होऊन बुधवारी पहाटे

रिक्षा-टेम्पो अपघातात ३ ठार, २ जखमी
पिंपरी : औंधकडून काळेवाडी फाट्याकडे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा आणि कुरिअर वाहतुकीचा विशालनगर (वाकड) येथून पुण्याकडे जाणारा टेम्पो यांची जगताप डेअरी चौकात धडक होऊन बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात तिघे जागीच ठार झाले, तर दोन जखमी झाले. हे सर्वजण रिक्षातील प्रवासी होते. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अंबादास कसबे (वय ५५, रा. विजयनगर, काळेवाडी), केतन कुंडलिक सरोदे (रिक्षाचालक, वय २५, रा. कुंजीर चाळ, रहाटणी), संदीप महादेव घोडके (वय ३२, गणेशनगर, डांगे चौक, थेरगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत, तर मिलिंद जयवंत निकम (वय ४३, रा. बिजलीनगर), नागेश नानासाहेब तांबे अशी जखमींची नावे आहेत. जखमींना औंध सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या रिक्षाचालकासह दोघे आणि जखमी तिघे असे पाचजण रिक्षातून जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची (एमएच १२ एआर २५७८) रिक्षाला (एमएच १२ जेएफ १९७) धडक बसली. जगताप डेअरी चौक वाय जंक्शनजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला. सांगवी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.(प्रतिनिधी)