शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला धडक देऊन जखमी करणार्‍या रिक्षाचालकास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:56 IST

भरधाव वेगाने रिक्षा चालवून पोलिसाला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी रिक्षाचालकास न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

ठळक मुद्देशौकतअली गुलामअली खान (वय ४५) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

पुणे : भरधाव वेगाने रिक्षा चालवून पोलिसाला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी रिक्षाचालकास न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांनी हा आदेश दिला. आरोपी घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला नाही. त्याने जखमी व्यक्तीस वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी रुग्णालयात नेण्याचे औदार्य दाखविल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.  शौकतअली गुलामअली खान (वय ४५, रा. कोंढवा ब्रुद्रुक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी देवेंद्र  रामकृष्ण व्हटकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार खान विरोधात भारतीय दंड विधान कलम २७९, ३३७ आणि मोटार वाहन अधिनियम कलम ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना १७ सप्टेंबर २०१४ रोजी येरवडा येथील कारागृहासमोर घडली. फिर्यादी हे येरवडा कारागृह येथे शिपाई म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी त्यांच्या मुलाने त्यांना दुचाकीवरून येरवडा कारगृह येथे सोडले. रस्ता ओलांडताना मनोरुग्णालयाकडून भरधाव वेगात आलेल्या रिक्षाची धडक व्हटकर यांना बसली. त्यात, त्यांच्या डोक्याला मार लागून हात मोडला होता. यावेळी, येथील गार्डकर्मचारी व रिक्षाचालकाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तो निघून गेल्याने त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. यात फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. 

टॅग्स :crimeगुन्हेPuneपुणेPoliceपोलिस