रिफ्लेक्टर सक्तीवरून रिक्षाचालक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:25+5:302021-06-22T04:08:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: मालमोटारींना लागणारे रेडियम रिफ्लेक्टर रिक्षांना सक्तीचे करण्यात आल्याने रिक्षाचालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आम आदमी ...

Rickshaw puller aggressive with reflector force | रिफ्लेक्टर सक्तीवरून रिक्षाचालक आक्रमक

रिफ्लेक्टर सक्तीवरून रिक्षाचालक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: मालमोटारींना लागणारे रेडियम रिफ्लेक्टर रिक्षांना सक्तीचे करण्यात आल्याने रिक्षाचालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेच्या सदस्यांंनी सोमवारी आरटीओ कार्यालयात गणवेश काढून निषेध व्यक्त केला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले. बनियनवर येऊ नका, ही त्यांची विनंती अमान्य करून तसेच निवेदन देण्यात आले.

जड वाहनांसाठी रिफ्लेक्टरची रुंदी ५० एमएम असणे बंधनकारक आहे. रिफ्लेक्टरच्या प्रत्येक १० मीटरनंतर त्यावर एक क्यूआर कोड आहे. रिफ्लेक्टर खरेदी केल्यानंतर हा क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र विक्रेत्याने जड वाहनाच्या मालकाला द्यायचे आहे. रिफ्लेक्टर लावलेले नसतील व हे प्रमाणपत्र नसेल तर जड वाहनांना वाहतुकीचा परवाना मिळत नाही, असे संघटनेचे पदाधिकारी अंकुश आनंद यांनी सांगितले.

एरवी फक्त १०० रूपयात त्यांचे काम व्हायचे. आता त्यासाठी त्यांंना १ हजार रूपये मोजावे लागतील. जड वाहनांना १० मीटरच्या पट्टीची गरज असते. रिक्षासाठी २ मीटर टेपही जास्त होईल, पण क्यूआर कोडसाठी त्यांना १० मीटरचीच खरेदी गरज नसताना करावी लागेल.

५० एमएम रुंदीचा टेपही रिक्षाचा आकार लक्षात घेता जास्तच होणार आहे. तरीही तो खरेदी करावाच लागणार आहे, कारण त्याशिवाय रिक्षा पासिंग होणार नाही.

Web Title: Rickshaw puller aggressive with reflector force