शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बंदमध्ये रिक्षा पंचायत सहभागी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 16:44 IST

रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने मंगळवारी बंद पुकारला आहे.

ठळक मुद्देडॉ. बाबा आढाव यांनी बंदला पाठिंबा दिल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील अनेक रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा

पुणे : विविध मागण्यांसाठी काही रिक्षा संघटनांनी येत्या मंगळवारी (दि. ९) पुकारलेल्या बंदमध्ये रिक्षा पंचायत सहभागी होणार नाही. डॉ. बाबा आढाव यांनी बंदला पाठिंबा दिल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. कोणालाही न विचारताच रिक्षा पंचायतसह काही संघटनांची नावे बंदच्या पत्रकात छापण्यात आल्याची माहिती पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली. त्यामुळे या बंदमध्ये रिक्षाचालकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने मंगळवारी बंद पुकारला आहे. समितीने पुणे व पिंपरी चिंचवडमधील अनेक रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, पवार यांनी हा दावा खोडून काढला आहे. याबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या या बैठकीत आप रिक्षा संघटनेचे श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघटनेचे संजय कवडे, रिपब्लिकन वाहतूक संघटनेचे अजीज शेख, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे,रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवडचे अशोक मिरगे यासंह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्याचप्रमाणे रिक्षा चालकांच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या प्रश्नांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. हे प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित संघटनांनी एकजूट व्यक्त केली. रिक्षा चालकांच्या प्रश्नांचे भांडवल करून आपली तुंबडी भरणाऱ्या संघटना, एजंट पुढाºयांचा निषेध करण्यात आला. याच एजंट संघटनांनी रिक्षा परवाना खुला करण्याची मागणी केली होती. परवाना खुला झाल्यावर यातील पदाधिकाऱ्यांनी रिक्षा विक्रीची एजन्सी सुरू केली. आता रिक्षांची संख्या प्रचंड वाढून रिक्षा सेवेचा बट्ट्याबोळ झाला त्यामुळे यांनी परवाना थांबवा अशी मागणी सुरू केली आहे. त्यांच्यामागे कोणतीही रिक्षा संघटना नसल्याने न विचारताच नावे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे रिक्षा पंचायतसह इतर रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती पवार यांनी दिली.-------------- आज निदर्शनेओला उबेरच्या बेकायदा वाहतूकीवर कारवाई , रिक्षा विमा हप्ता जोखमी एवढाच असावा, रिक्षा पासिंग मधील अडचणी, रिक्षा खुला परवाना बंद करणे अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा पंचायतच्या वतीने सोमवारी (दि. ८) दुपारी अडीच वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. यावेळी विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाBaba Adhavबाबा आढाव