शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ईडी-फिडीला मी घाबरत नाय; ईडी म्हणजे आमच्यासाठी रिक्षाचालक! भाजप खासदार गिरीश बापट यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 14:53 IST

पुण्यात आरटीओ कार्यालयासमोर खासदार गिरीश बापट यांचे धरणे आंदोलन

ठळक मुद्देसर्वांनी रिकाम्या ताटल्या, वाट्या हातात घेऊन सरकारचा निषेध केला

पुणे: पुण्यात रिक्षाचालकांना जाहीर केलेली आर्थिक मदत न दिल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप खासदार गिरीश बापट यांच्या पाठीमागे एक आंदोलनकर्ता येऊन बसला. त्याच्या नावाचा शॉर्ट फॉर्म ''ईडी'' असा होत होता. याचाच संदर्भ घेऊन एक जण म्हणाला, बापट साहेब, "तुमच्या मागे 'ईडी' बसला आहे. हे ऐकताच गिरीश बापट म्हणाले, अशा ईडी फिडीना मी काय घाबरत नाही, असे वक्तव्य भाजप खासदार गिरीश बापट यांनी केले. 

सरकारने संचारबंदीच्या पार्श्ववभूमीवर रिक्षाचालकाना १५०० अनुदान जाहीर केले. ते बँक खात्यात जमा करण्याची घोषणाही केली. पण दोन महिने उलटूनही त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तातडीने रिक्षाचालकांना अनुदान द्यावे. या मागणीकरिता खासदार गिरीश बापट यांनी पुणे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यावेळी उपस्थित सर्वांनी रिकाम्या ताट, वाट्या हातात घेऊन सरकारचा निषेध केला.

यावेळी खासदार बापट म्हणाले, आजपर्यंत असंख्य आंदोलने केले आहे. "ईडी-फिडीला मी काय घाबरत नाय; आणि ईडीला आमच्याकडे येऊन काय मिळणार ? कारण आमच्या खिशात चणे-फुटाणे असतात.आणि आमच्यासाठी ईडी म्हणजे रिक्षाचालक आहे, हे वाक्य उच्चारताच उपस्थितांमध्ये जोरदार हास्याचे कारंजे फुलले. 

राज्य सरकारने रिक्षा चालकांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी १५०० रुपयांच्या मदतीची घोषणा झाली. मात्र अद्याप रिक्षा चालकांना या सरकारी अनुदानाचा एक रुपया मिळालेला नाही. सरकारने राज्यातील परमिट धारक रिक्षा चालकांना मदतीसाठी जवळपास १८० कोटीचा निधी उपलब्ध करून तो परिवहन विभागाकडे सुपूर्द केला आहे. मात्र, लिंक ओपन न होणे, माहिती अर्धवट आहे असे सांगून परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांना मदत देण्यास अडसर निर्माण केला जात आहे. ही दिरंगाई लवकरात लवकर दूर व्हावी व प्रशासनाला जाग यावी या करिता हे आंदोलन करत असल्याचे बापट यांनी सांगितले.

यावेळी स्वरदा बापट, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाबा कांबळे, रिक्षा फेडरेशनचे बापू भावे, वाहतूक सेनेचे एकनाथ ढोले, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी व अन्य रिक्षाचालक उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटGovernmentसरकारBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या