शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

एक वाचक आणि अभिनेता म्हणून 'श्रीमंत' अनुभव: दिलीप प्रभावळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:05 IST

पु.लंना बोजड लिहिणे कधीच शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्यावर आधारित कलाकृती सादर करताना पाठांतर करणे सोपे गेले...

पुणे :  पु.ल. देशपांडे यांची वाचकांच्या मनात विनोदी साहित्यिक अशी प्रतिमा असली तरी ते एक चिंतनशील साहित्यिक होते. पु.ल. एखाद्या समस्येबाबत किती गंभीरपणे विचार करू शकतात याचा प्रत्यय त्यांच्या लिखाणातून येतो. ऑडिओ बुकसाठी वाचन करताना पुन्हा एकदा त्यांचे साहित्य कुतूहलाने वाचले. त्यांची शब्दांची निवड,त्याचा अर्थ,आशय,समजावून घेण्याची प्रक्रिया सुरूच होती. कारण ते सर्व ऐकणा-यापर्यंत पोहचविणे ही जबाबदारी होती.ऑ डिओ बुकसाठी पु.लंच्या पुस्तकाचे वाचन करताना ते परिणामकारक रितीने वाचले जावे याचे भान मला ठेवावे लागले. हे करताना एक वाचक म्हणून आणि एक अभिनेता म्हणून सुद्धा एक श्रीमंत अनुभव होता....अशा शब्दांत प्रतिभावंत लेखक, अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी आॅडिओबुक्सच्या माध्यमातून  गवसलेले 'पु.ल' उलगडले.      पुलं आणि सुनिताबाई देशपांडे यांच्या कलाकृतींचा श्रवणीय आनंद रसिकांना 'ऑडिओबुक्स'च्या माध्यमातून घेता येणार आहे. त्यानिमित्त 'पुलं, सुनीताबाई आणि ऑडिओबुक्स : एक अनुभव या वातार्लापाचे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी आॅडिओबुक्सच्या वाचनप्रक्रियेत सहभागी झालेले  दिलीप प्रभावळकर, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी आणि पु.ल.देशपांडे कुटुंबीय दिनेश आणि ज्योती ठाकूर, सतीश जकातदार, स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ, प्रसाद मिरासदार उपस्थित होते.  पु.लंना बोजड लिहिणे कधीच शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्यावर आधारित कलाकृती सादर करताना पाठांतर करणे सोपे गेले. त्यांचे समृद्ध होणारे लिखाण मला अभिनयासाठी उपयोगी पडले असे सांगून प्रभावळकर म्हणाले,  पु.लं.च्या चैतन्यशील, वैचारिक आणि गंभीर लिखाणाचा अत्युच्च अनुभव मला ऑडिओ बुक करताना पुन्हा एकदा आला. त्यांच्या साहित्याशी जवळीक असल्याचा फायदाही ऑडिओ बुक वाचताना झाला.डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या, ऑडिओ बुकच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा श्रवण संस्कृतीकडे वेगळ्या कारणांनी वळलो आहोत. वाचन करताना छापील शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन आपण वाचतो. परंतु ऑडिओ बुकसाठी वाचन करताना त्या शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा नाद, लयही उच्चरली जाते. त्यामुळे त्या शब्दाला एक अर्थ वलयप्राप्त होते. छापील कागदावर शब्द पूर्ण जिवंत नसतो परंतु वाचताना तो पूर्ण जिवंत होतो.  सुनीताताईंच्या पुस्तकांचे ऑडिओबुकसाठी वाचन करताना त्या आत्मचिंतन करत आहेत अथवा स्वगत बोलत आहेत असे वाटते. त्यांच्या पुस्तकांचे वाचन करणे हा एक छान व शिकवणारा अनुभव होता असे सांगून त्या म्हणाल्या, चांगली पुस्तके रसिकांपर्यंत पोहचवणे हाच एकमेव उद्देश ठेवून वाचन केले मात्र,त्यामुळे माणूस किती समृद्ध होतो याचाही अनुभव यानिमित्ताने आला. आपल्या जगण्याबद्दल,मानवी संबंधाबद्दल अनेक गोष्टी शिकता आल्या. ------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेP L Deshpandeपु. ल. देशपांडेDilip Prabhavalkarदिलीप प्रभावळकर cinemaसिनेमाliteratureसाहित्य