लय भारी धमाल ला उत्स्फू र्त प्रतिसाद

By Admin | Updated: October 15, 2015 00:27 IST2015-10-15T00:27:17+5:302015-10-15T00:27:17+5:30

संगीताच्या तालावर फुगे फोडणे, पाणी बाटलीत भरणे, क्रिकेट खेळत, नृत्याचा आनंद घेत, विविध उखाणे सादर करीत सखींनी ‘लय भारी’ धमाल गेम शोचा आनंद लुटला

Rhythm Heavy Bluffs Flood Response | लय भारी धमाल ला उत्स्फू र्त प्रतिसाद

लय भारी धमाल ला उत्स्फू र्त प्रतिसाद

पिंपरी : संगीताच्या तालावर फुगे फोडणे, पाणी बाटलीत भरणे, क्रिकेट खेळत, नृत्याचा आनंद घेत, विविध उखाणे सादर करीत सखींनी ‘लय भारी’ धमाल गेम शोचा आनंद लुटला. या गमतीशीर खेळात पुरुषही उत्साहाने सहभागी झाले.
आकुर्डी-चिंखली रोड येथील ऐश्वर्यम कोर्ट यार्ड व चिखलीतील रस्टिक पॅराडाईज सोसायटीत ‘लोकमत’ सखी मंच व कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांच्या वतीने आयोजित धमाल गेम शो मध्ये उपस्थित सर्वच रंगन गेले.
शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात मंगळवारपासून झाली. आजचा रंग होता निळा. त्यामुळे गेम शोला निळ्या रंगाच्या साड्या परिधान करून सखी आल्या होत्या. सायंकाळी चारच्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर मनोरंजक कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभय गायकवाड यांनी विनोदी शैलीत विविध खेळ खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ऐश्वर्यम सोसायटीत लुंगी डान्स वर लहान मुलांनी नृत्य केले. मेकअप गेम मध्ये महिला पोट धरुन हसल्या. या गेममध्ये चॉकलेट शोधायचं होतं. महिलांनी सटकली रे सटकली गाण्यावर ठेका धरला. ऐश्वर्यम सोसायटीतील अनीता शिंंदे, मनीषा दळवी, सुनीती कांबळे, ‘रस्टिक’मधील रामकृष्ण पाटील, साजिद सय्यद, जयंत कांबळे यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Rhythm Heavy Bluffs Flood Response